अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे शेततळ्यात बुडून सख्या बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू ( Brother Sister Drowned ) झाला आहे. ही घटना रविवार ८ मे रोजी सकाळी घडली आहे. या दुर्दैवी घटनेने मोधळवाडी गावात शोककळा पसरली आहे. जयश्री बबन शिंदे वय ( वर्षै २१) व आयुष बबन शिंदे वय ( ७) असे बहीण- भावाचे नाव आहे.
गावावर शोककळा
जयश्री व आयुष हे दोघे बहीण - भाऊ शेततळ्यात बुडाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. पण त्या अगोदरच बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतद्ह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात नेण्यात आले आहे. तर बहीण- भावाच्या दुर्दैवी मृत्यूने पिंपळगाव देपा गावासह पठारभागावर शोककळा पसरली आहे. जयश्री व आयुष या दोघा बहीण- भावाचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता.