ETV Bharat / state

शिर्डीत मानलेल्या भावाने केले बहिणीवर ब्लेडने वार - shirdi crime news

शिर्डीतील विवेकानंद नगर परिसरात राहणाऱ्या विजय भाटे यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याच्या वादातून विजयच्या पत्नीच्या मानलेल्या भावाने बहिणीवरच ब्लेडने वार केला.

shirdi police
shirdi police
author img

By

Published : May 26, 2021, 6:12 PM IST

Updated : May 26, 2021, 7:45 PM IST

शिर्डी - शहरातील विवेकानंद नगर परिसरात राहणाऱ्या विजय भाटे यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याच्या वादातून विजयच्या पत्नीच्या मानलेल्या भावाने बहिणीवरच ब्लेडने वार केला. त्यानंतर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेच्या पतीने शिर्डी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार पवन परदेशी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

भावाने केले बहिणीवर ब्लेडने वार

शिर्डीतील स्वामी विवेकानंद नगरात राहणाऱ्या विजय भाटे यांच्या लग्नाला बारा वर्षे झाली. त्याचा आनंद ते कुटुंबीयांसमवेत साजरा करत होते. तितक्यात विजयच्या पत्नीने भाऊ मानलेला पवन परदेशीने केक कापू नका, फोटो काढू नका, असे धमकावकत गोंधळ घातला. यावेळी विजयने त्यास असे का करू नये विचारले व त्या़ंच्यात वाद झाला. दरम्यान, पवनने आपल्याबरोबर आणलेल्या ब्लेडने विजयच्या पत्नीच्या गळ्याव वार केले. त्यानंतर उपस्थितांना धक्काच बसला. याच दरम्यान पवननेही स्वत: वर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

विजय भाटे यांच्या लग्नाचा काल वाढदिवस होता. सायंकाळी घरातच वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुबीय तसेच शेजारील घरात जमले होते. यावेळी पवनही उपस्थित होता. या दरम्यान केक कापू नका, फोटो काढू नका या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. यावेळी पवनने भाटे कुटुंबीयांवर धारदार शस्राने वार करून स्वतःवरही वार केले. त्यानंतर आसपासच्या नागरिकांनी जखमी झालेल्या महिलेला तत्काळ उपचारासाठी साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान शिर्डी पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल होत युवकास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या संदर्भात आज विजय भाटे यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास शिर्डी पोलिसांनी सुरू केला असल्याची माहिती शिर्डी पोलीस निरीक्षक प्रविणचंद लोखंडे यांनी दिली आहे. या घटनेने शिर्डीत भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, महिला आणि युवकावर तातडीने उपचार केल्याने दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Last Updated : May 26, 2021, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.