अहमदनगर: आम्ही लहानपणापासून साईबाबांचे भक्त आहोत. अनेक वेळा साई दर्शनाला आलो आहोत. पूर्वी आम्ही साईबाबांच्या दर्शनाला येत होतो तेव्हा दोन ते तीन तास रांगेत उभे राहण्याची वेळ येत होती. मात्र आता पाच मिनिटात साईबाबांचे दर्शन झाल्याने आनंद होत आहे. हे ही बाबांचे आशीर्वाद असल्याचे बिग बॉस फेम साजिद खान यांनी म्हटले आहे.
साई समाधीचे दर्शन: फराह खान आणि चित्रपट दिग्दर्शक साजिद खान यांनी शुक्रवारी साई दरबारी पोहचून साई समाधीचे दर्शन घेतले. शिर्डीच्या साईबाबा मंदिराला भेट दिल्याप्रित्यर्थ संस्थानाकडून दोन्ही सेलिब्रेटींचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना साजीद खान बोलत होते.
शिर्डीतील आठवणींना उजाळा: दर्शनानंतर फराह खान आणि साजिद खान यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत केली. यावेळी बोलताना फराह खान म्हणाल्या की, मी मागच्या वर्षी आले तेव्हा साजिदला बिग बॉस चांगले जावे यासाठी मन्नत मागितली होती. ती मन्नत पूर्ण झाल्यानंतर आज साईबाबांना धन्यवाद म्हणण्यासाठी मी साजिदला घेऊन शिर्डीत आले आहे. आम्ही लहानपणापासून शिर्डीत येत आहोत. पूर्वी आमच्या बिल्डिंगमधून जी बस शिर्डीसाठी निघायची. तिच्यात बसून आम्ही शिर्डीत येत होतो. असे देखील फराह यांनी सांगितले. पत्रकारांनी इतर प्रश्न विचारल्यानंतर शिर्डी व्यतिरिक्त इतर काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.
रविना टंडनचीही साई दरबारी हजेरी: शिर्डीत साईबाबांना मी कधीच काही मागत नाही. साईबाबा न मागताच मला सर्व काही देतात, अशा भावना अभिनेत्री रवीना टंडनने व्यक्त केल्या आहेत. ती 17 जानेवारी, 2023 रोजी शिर्डीत साईबांबाच्या दर्शनासाठी आली होती. यावेळी साईबाबा संस्थानच्यावतीने रवीना टंडन यांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला.
साई आरतीने मनाला समाधान: शिर्डी साईबाबा माझाकडून काही घेऊन गेले आणि त्यांनी काही दिले पण. अशा भावना अभिनेत्री रविना टंडनने शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केल्या. त्या पुढे म्हणाले की, मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात माझ्या वडिलांचे निधन झाले आणि आज शिर्डी साईबाबांना विचारण्यासाठी आले होते, की माझे वडील तुमच्या सोबत आहे ना. आज शिर्डी साईबाबांच्या माध्यान आरतीला उपस्थित राहता आल्याने मनाला खूप समाधान मिळाले असल्याचे यावेळी अभिनेत्री रविना टंडन यांनी सांगितले.
साईबाबांच्या चरणी प्रार्थना: शिर्डी साईबाबांना मी कधीच काही मागत नाही तर साईबाबा न मागताच मला सगळे देत असतात. यामुळे मी साईबाबांचे आभार मानण्यासाठी आज शिर्डीला आली असल्याचे अभिनेत्री रविना टंडन म्हणाल्या. मी लहानपणापासून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत आहे. माझी मुलगी 12 वीत शिकत आहे. तिचे पेपर सुरू होणार असल्याने ती शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येवु शकली नाही. मी तिच्यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली असल्याचेही रविना यांनी साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.
हेही वाचा: Shinde Group Celebratration : निकालानंतर शिंदे गटाच्या आमदारांचा जल्लोष; कार्यकर्तेही झाले झिंगाट