ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये रेशनचा काळाबाजार; ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त - अहमदनगरमध्ये रेशनचा काळाबाजार

नगर शहरामध्ये रेशनचा गहू व तांदूळ सर्रासपणे काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी अवैधरित्या साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार मार्केट यार्ड येथील सुरेश ट्रेडिंग कंपनी व सोहम ट्रेडीग कंपनी या दोन्ही दुकानावर पथकाने छापा टाकला. यावेळी धान्य व सहा वाहने मिळून सुमारे ४२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Black market of rations; 42 lakhs grain caught in ahmednagar
अहमदनगरमध्ये रेशनचा काळाबाजार
author img

By

Published : Jun 20, 2021, 12:45 PM IST

अहमदनगर - रेशनिंगचा तांदूळ व गहू काळ्या बाजारामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने केलेला सुमारे पावणे आठ लाखाचा अवैध धान्य साठा कोतवाली पोलीस तसेच जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने जप्त केला. शहरातील मार्केट यार्ड तसेच केंडगाव इंडस्ट्रीज इस्टेट अशा दोन ठिकाणी संबंधित व्यापाऱ्याच्या दुकान व गोदामवर पोलिसांनी छापा टाकून धान्य व सहा वाहने मिळून सुमारे ४२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी मार्केट यार्डमधील २ दुकाने व केडगाव येथील संबंधित गोडाऊन सील केले आहे.

सहा जण पोलिसांच्या ताब्यात -

या दोन्ही प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये सुरेश रासकर, संग्राम रासकर, आसाराम रासकर, व्यवस्थापक जालिंदर चितळे यांच्यासह दोन वाहन चालक आशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी ४१९ गोण्या तांदूळ व १२५ गोण्या गहू असा माल मार्केट यार्ड येथील दुकानातून जप्त केला. तर केडगाव येथील गोदामात १३२ गोण्या तांदूळ, २४७ गोण्या गहू व बारदाण्यात गहू भरलेल्या ४७ गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. हा सगळा धान्यसाठा हरियाणा व मध्यप्रदेश राज्यातील रेशनिंगचा आहे. पोलिसांनी या धान्यासह रेशनिंग धान्याच्या रिकाम्या गोण्या, ४ ट्रक व एक छोटा हत्ती वाहन, एक पिकअप वाहन असा सर्व मिळून ४२ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

माहिती मिळताच पोलीस, पुरवठा विभागाने केली कारवाई-

नगर शहरामध्ये रेशनचा गहू व तांदूळ सर्रासपणे काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी अवैधरित्या साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती पोलीस व महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर मार्केट यार्ड येथील सुरेश ट्रेडिंग कंपनी व सोहम ट्रेडीग कंपनी या दोन्ही दुकानावर आधी छापा टाकण्यात आला. हे दोन्ही दुकाने सुरेश रासकर यांच्या नावावर आहेत. पोलिसांनी या ठिकाणी मुद्देमाल हस्तगत करून त्या ठिकाणी असलेली बिलांची तपासणी सुद्धा सुरू केली आहे. ही दोन्ही दुकाने सील करण्यात आली आहेत.

असा आहे मुद्देमाल आणि त्यांची किंमत-

मार्केट यार्ड येथील या दुकानांमध्ये कोतवाली पोलिसांनी काळ्या बाजारात नेण्यात येणार्‍या २५३ गोण्या तांदुळाच्या व १२५ गोण्या गव्हाच्या सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल तसेच याठिकाणी दोन ट्रक यांची सुमारे किंमत प्रत्येकी पाच लाख अशा एकूण १४ लाख रुपयांचा ऐवज मार्केट यार्ड परिसरातून हस्तगत केलेला आहे. याचवेळी पोलिसांनी व प्रशासनाच्या पथकाने रासकर यांच्या केडगाव इंडस्ट्रीजमध्ये असलेल्या गोदामावर छापा टाकून त्या ठिकाणी तांदळाच्या १३२ गोण्या, २४७ गव्हाच्या गोण्या व ४७ आणखी गव्हाच्या गोण्या आशा सर्व मिळून ४१९ गोण्या जप्त केल्या. मार्केट यार्डमधील धान्य सुमारे पावणे चार लाखाचे तर केडगाव येथील धान्य सुमारे ४ लाखाचे असून दोन्ही मिळून सुमारे ८ लाखाचे धान्य तसेच सुमारे ३३ लाख रुपये किमतीची ६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

यांनी केली कारवाई -

नगर शहराचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कचरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने तसेच पुरवठा निरीक्षक निशा पाईकराव, अन्नधान्य निरीक्षक व कार्यालयीन अधीक्षक संतोष लोटके यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसून त्याची प्रक्रिया सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.