ETV Bharat / state

थेट दिल्लीहून विमानाने अहमदनगरकरिता तीनशे रेमडेसेवीर पोहोच; खासदार सुजय विखेंचे प्रयत्न - remdesivir by plane to Shirdi

स्वतः खासदार सुजय विखे यांनी 19 एप्रिल रोजीच रेमडेसिवीर इंजेक्शन शिर्डीत आणली आहेत. त्यांनी विमानात याबद्दल माहिती देणारा स्वतःचा व्हिडीओ चित्रित केला आहे. हा व्हिडिओ आज व्हायरल झाला आहे.

खासदार सुजय विखे
खासदार सुजय विखे
author img

By

Published : Apr 24, 2021, 3:37 PM IST

Updated : Apr 24, 2021, 4:45 PM IST

अहमदनगर- सध्या रेमडेसेवीर आणि ऑक्सिजनचा राज्यभरासह अहमदनगर जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसेवीरकरिता रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी दमछाक आणि हतबलता हे सार्वत्रिक चित्र आहे. अशात भाजपचे खासदार सुजय विखे यांनी थेट दिल्लीतून जेट विमानाने तीनशे रेमडेसेवीर इंजेक्शनची व्यवस्था केली आहे.

कोरोना विषाणूमुळे फुफुसात संसर्ग वाढत असल्यास आणि ऑक्सिजन पातळी खाली गेल्यानंतर पेशंटला रेमडेसेवीर इंजेक्शनची गरज भासत आहे. जिल्ह्यातील रुग्णांसाठी रेमडेसेवीर इंजेक्शन आणण्यासाठी भाजपचे खासदार सुजय विखे स्वतः दिल्लीला गेले. त्यांनी खासगी जेट विमानातून ही रेमडेसेवीर इंजेक्शन थेट शिर्डी विमानतळावर उतरवली. स्वतः खासदार विखे यांनी 19 एप्रिल रोजीच ही इंजेक्शन शिर्डीत आणली आहेत. त्यांनी विमानात याबद्दल माहिती देणारा स्वतःचा व्हिडीओ चित्रित केला आहे. हा व्हिडिओ आज व्हायरल झाला आहे.

हेही वाचा-टाटासह लिंडेकडून जर्मनीमध्ये 24 ऑक्सिजन टँकरची खरेदी; विमानाने भारतात येणार

जिल्ह्यातील तीन मोठ्या रुग्णालयात इंजेक्शनचे वाटप-
सुजय विखे हे न्यूरोसर्जन आहेत. खासदार म्हणून जनतेची काळजी आहे, पण डॉक्टर या नात्याने डोळ्यासमोर वीस-बावीस वर्षांची तरुण मुले मरताना पाहून आपले मन हेलावले. त्यामुळे आपले दिल्लीत असलेले वैयक्तिक संबंध पणाला लावून तीनशे रेमडेसेवीर इंजेक्शन मिळविल्याचे त्यांनी सांगितले. स्वखर्चाने इंजेक्शन जेट विमानातून नगर जिल्ह्यासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले. ही इंजेक्शन शिर्डीच्या साईबाबा रुग्णालय, लोणी येथील प्रवरा रुग्णालय आणि नगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्रत्येकी शंभर पोहोच करण्यात आली आहेत.

दिल्लीहून विमानाने अहमदनगरकरिता तीनशे रेमडेसेवीर पोहोच

हेही वाचा-मुंबईत लसीचा तुटवड्यामुळे 52 लसीकरण केंद्र बंद; दुसरा डोस असलेल्यांनाच प्राधान्य

नेत्यांनी राजकारण न करता रुग्णांचे जीव वाचवा-
खासदार विखे यांनी आपल्या व्हिडीओ निवेदनात म्हटले, की सध्या ऑक्सिजन आणि रेमडेसेवीर इंजेक्शनवरून राजकारण सुरू आहे. या भीतीमुळे आपण इंजेक्शन दिल्लीहून नगर जिल्ह्यात पोहोचेपर्यंत त्याची वाच्यता केली नाही. कदाचित माझ्यावर कारवाई होईल, असेही वाटले. सध्या रुग्णांचे जीव महत्वाचे आहेत. रुग्णाला जात, धर्म व पक्ष महत्त्वाचा नसतो. ही इंजेक्शन घेणारा कदाचित कोणी रुग्ण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप असा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू शकतो. सध्या सर्व पक्षांनी किमान दहा दिवस राजकारण बाजूला ठेवून ज्याला जमेल तेथून रुग्णांसाठी औषध-उपचार मिळवून द्यावेत. आपण एक खासदार म्हणून नव्हे तर एक डॉक्टर या नात्याने ही इंजेक्शन उपलब्ध केल्याचे विखे यांनी स्पष्ट केले आहे. तरीही कुणाला यात काही गैर वाटून माझ्यावर कारवाई करायची असेल तरी आपल्याला चिंता नसल्याचे सांगत विखे यांनी राज्य सरकारवर एकप्रकारे निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज्यात रेमडेसेवीरचा तुटवडा असताना भाज पक्षाला ही इंजेक्शन मिळत असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर यापूर्वीच टीका केली आहे.

Last Updated : Apr 24, 2021, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.