ETV Bharat / state

केवळ मुंबई पुरतेच निर्णय; ग्रामीण महाराष्‍ट्र वाऱ्यावर - राधाकृष्ण विखे पाटील - Ahmednagar corona

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारला ७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त्ताने भारतीय जनता पक्षाच्‍यावतीने 'सेवा ही संघटन' या उपक्रमातून गाव पातळीवर आरोग्‍य सेवांचे उपक्रम तसेच कोविड योद्धांना सन्‍मानित करण्‍यात आले.

राधाकृष्ण विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : May 30, 2021, 3:03 PM IST

अहमदनगर - 'ज्‍यांच्‍यावर जबाबदारी होती त्‍यांनी केवळ मुंबई पुरतेच निर्णय करुन, ग्रामीण महाराष्‍ट्राला वाऱ्यावर सोडून दिले. फक्‍त केंद्र सरकारकडून मदतीच्‍या अपेक्षा करायच्‍या, मग तुम्‍ही काय करणार? मुंबई महा‍पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्‍या निर्णयाचा कोणताही लाभ ग्रामीण महाराष्‍ट्राला होणार नाही', असा थेट आरोप भाजपाचे जेष्‍ठ नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. मानवतेच्‍या दृष्‍टीकोनातून सरकारी यंत्रणेतील आधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना संकटात केलेल्‍या निरपेक्ष कामांमुळेच सामान्‍य माणसाला आधार वाटल्‍याचे गौरवोद्गारही त्‍यांनी काढले.

कोरोना योद्धांचा सन्मान
कोरोना योद्धांचा सन्मान

शिर्डी विधानसभा मतदारसंघात कोविड केअर सेंटरच्‍या माध्‍यमातून रुग्‍णांना सेवा देणाऱ्या सरकारी वैद्यकीय आधिकारी, खासगी रुग्‍णालयातील डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांसह रुग्‍णवाहिका चालक, सफाई कामगार, आशा सेविका आणि नर्सिंग स्‍टाफचा कोरोना योध्‍दा म्‍हणून सन्‍मान करण्‍यात आला. आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने प्रातिनिधीक स्‍वरुपात हा कृतज्ञता कार्यक्रम संपन्‍न झाला. सेवा सप्‍ताहाच्‍या निमित्‍ताने भाजपाचे कार्यकर्ते कोरोना योध्‍यांना घरी जावून सन्‍मानित करणार आहेत.

सेवा सप्ताहाचे आयोजन -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारला ७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त्ताने भारतीय जनता पक्षाच्‍यावतीने 'सेवा ही संघटन' या उपक्रमातून गाव पातळीवर आरोग्‍य सेवांचे उपक्रम तसेच कोविड योद्धांना सन्‍मानित करण्‍यात आले. शिर्डी विधानसभा मतदार संघातील आरोग्‍य, महसुल तसेच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका अशा एकुण १५०० हून अधिक कोरोना योद्धांना सन्‍मानित करण्‍यासाठी राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या वतीने आयोजन करण्‍यात आले होते. शिर्डी येथील साई संस्‍थानच्‍या सुपर स्‍पेशालिटी रुग्‍णालयात डॉक्‍टरांसह पोलीस आधिकारी, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्‍टाफ तसेच लॅब टेक्‍न‍िशियन यांना विखे पाटील यांच्‍या हस्‍ते शाल आणि कृतज्ञता सन्‍मान चिन्‍ह देवून गौरविण्‍यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.