ETV Bharat / state

'महाविकासआघाडी सरकार केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चालतंय' - bjp agitation news

लोणी बुद्रूक ग्रामपंचायत कार्यालयासमोर राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली सोशल डिस्‍टन्सिंगचे नियम पाळून महाराष्‍ट्र बचाव आंदोलन करण्‍यात आले. शिर्डी मतदारसंघातील सर्वच गावांमध्‍ये कार्यकर्त्‍यांनी आपल्‍या घराच्‍या अंगणात महाराष्‍ट्र बचाव आंदोलन करून आघाडी सरकारच्‍या नाकर्तेपणाचा मास्‍क बांधून आणि काळे झेंडे दाखवून निषेध केला.

'महाविकासआघाडी सरकार केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चालतंय'
author img

By

Published : May 22, 2020, 5:32 PM IST

अहमदनगर - कोरोना संकटातून महाराष्‍ट्राला वाचविण्‍यात राज्‍य सरकार संपूर्णत: अपयशी ठरले असून सरकारच्‍या नाकर्तेपणामुळेच राज्‍यात रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे. सरकारचे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन फक्‍त आधिकाऱ्यांच्‍या भरवश्‍यावर सुरू असून मंत्री फक्‍त मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्‍त व्‍हिडिओ कॉन्‍फरन्सिंगवर दिसत आहे, अशी टीका माजी मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली. लोणी बुद्रूक ग्रामपंचायत कार्यालयासमोर राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली सोशल डिस्‍टन्सिंगचे नियम पाळून महाराष्‍ट्र बचाव आंदोलन करण्‍यात आले. शिर्डी मतदारसंघातील सर्वच गावांमध्‍ये कार्यकर्त्‍यांनी आपल्‍या घराच्‍या अंगणात महाराष्‍ट्र बचाव आंदोलन करून आघाडी सरकारच्‍या नाकर्तेपणाचा मास्‍क बांधून आणि काळे झेंडे दाखवून निषेध केला.

राज्‍यात कोरोना संकटाचे भीषण वास्‍तव अधिक वाढत आहे. या संकटातून राज्‍याला वा‍चविण्‍यात सरकार पूर्णत: अपयशी ठरल्‍यामुळेच राज्‍यात रुग्‍णांची संख्‍या 41 हजारांपर्यंत जाऊन पोहोचली असल्‍याकडे लक्ष वेधून, केंद्र सरकारच्‍या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी राज्‍य सरकारने जाणीवपूर्वक केली नाही. केंद्र सरकारच्‍या मदतीचा लाभही आघाडी सरकार जनतेपर्यंत पोहचवू शकले नाही. सरकारच्‍या या हलगर्जीपणामुळेच सर्वसामान्‍य नागरिक मृत्‍युच्‍या खाईत लोटला गेला असल्‍याचा आरोप विखे पाटलांनी केला.

राज्‍यात पाहणी करण्‍यासाठी आलेल्‍या केंद्रीय समितीने 76 हजार बेडची उपलब्‍धता करण्‍याची सुचना सरकारला केली होती. परंतु आघाडी सरकार फक्‍त तात्‍पुरत्‍या उपाययोजना करत बसले. केंद्र सरकारने दिलेल्या पीपीई कीट डॉक्‍टर्स, नर्स आणि पोलीस दलापर्यंत पोहचल्या नाहीत. उलट पोलिसांवर हल्‍ले होत असताना सरकारमधील मंत्र्यांनी फक्‍त बघ्‍याची भूमिका घेतली. परप्रांतीय कामगारांना त्‍यांच्‍या राज्‍यात पाठविताना आघाडी सरकार अतिशय असंवेदनशील वागले. महाराष्‍ट्राच्‍या हद्दीपर्यंत सरकारने मदत केंद्र उभी करायला हवी होती पण सरकार तेही करू शकले नाही अशी खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

कोरोना संकटातच शेतकऱ्यांच्या आत्‍महत्‍या झाल्‍या याचेही सरकारला भान राहिले नाही. हे सरकार जनतेत दिसण्‍यापेक्षा व्‍हिडिओ कॉन्‍फरन्सिंगवर अधिक दिसते. फक्‍त फेसबुकवर संवाद साधते. केंद्र सरकारच्‍या २० लाख कोटी रुपयांच्‍या पॅकेजवर टीका करण्‍यापेक्षा राज्‍यातील जनतेला तुम्‍ही काय देणार? असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला. कॉंग्रेसचे अस्तित्‍वच आता कुठे दिसत नाही. त्‍यामुळे त्‍यांनी भाजपची चिंता करू नये. नगर जिल्‍ह्यात सरकारचे तीन मंत्री असतानाही जिल्‍ह्यातील जनतेला हे दिलासा देऊ शकले नाहीत. शेतकऱ्यांसह जिल्‍ह्यातील जनता यांनी वाऱ्यावर सोडली असल्‍याचे ते म्‍हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.