ETV Bharat / state

'त्या' आमदारांवर गुन्हा दाखल करावा - राधाकृष्ण विखे पाटील

author img

By

Published : Apr 19, 2021, 5:26 PM IST

राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्यसरकार अपयशी ठरले आहे. आपले अपयश लपविण्यासाठी राज्यसरकार केंद्र सरकारकडे बोट करत आहे. राज्यात अनेक कुटुंब कोरोनामुळे उध्वस्त झाले आहेत. ते सर्व लोक त्यांच्या शाप देत आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार पश्चाताप होणार आहे.

विखे पाटील
विखे पाटील

शिर्डी (अहमदनगर) - विरोधी पक्षनेते पद संविधानिक पद आहे. या पदावर असलेल्या व्यक्तिबाबत शिवसेनेच्या आमदाराने गलिच्छ वक्तव्य करून स्वतःच्या पक्षाचीच प्रतिमा मलीन केली आहे. पक्षप्रमुखाने त्या आमदारावर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.

बोलताना विखे पाटील

आमदार गायकवाड यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न

विखे पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना तातडीने समज देण्याची गरज होती. महाविकास आघाडी सरकामधील नेते नैतिकतेच्या गप्पा मारून केंद्रावर टीका करतात. मात्र, विरोधी पक्षनेत्यांवर गलिच्छ भाषेत टीका करणाऱ्या आमदाराला पाठीशी घालण्याचे काम करतात, असा आरोपही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

महाविकास आघाडीला प्रायश्चित करावे लागणार

राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्यसरकार अपयशी ठरले आहे. आपले अपयश लपविण्यासाठी राज्यसरकार केंद्र सरकारकडे बोट करत आहे. आज राज्यात कोरोनाने हजारो बळी गेले आहे. कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. हे सर्व लोक या सरकारला शाप देत असून सरकारला आपल्या अपयशाचे प्रायश्चित करावे लागणार असल्याचेही विखे-पाटील म्हणाले.

हेही वाचा - 'मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते'

हेही वाचा - पहिला प्रयोग तुमच्या मुख्यमंत्र्यांवर करा, नितेश राणे यांची शिवसेना आमदारावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.