अहमदनगर- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील कोविड केअर सेंटरमध्ये पारनेर तालुक्यातील भाजप नेते सुजित झावरे यांनी कोरोना महामारीतून सुटका व्हावी, रुग्णांना आराम मिळून ते बरे व्हावेत म्हणून एका विश्वशांती यज्ञाचे आयोजन केले होते. टाकळी ढोकेश्वर गावात माजी आमदार दिवंगत वसंतराव झावरे कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी तीनशे रुग्णांची व्यवस्था आहे. सध्या कोरोनावर नेमके औषध नसून विज्ञान कमी पडताना दिसत असल्याचे सांगत तालुक्यातील भाजप नेते सुजित झावरे यांनी थेट कोविड केअर सेंटर मध्येच विश्वशांती यज्ञ आयोजित केला होता. जगावर जेव्हा संकटे येतात त्या वेळी अग्नी पेटवून देवाची आराधना केली जाते असे झावरे यांनी म्हटले आहे.
भाजप नेत्याने कोविड सेंटरमध्ये केला विश्वशांती यज्ञ; अंधश्रद्धा निर्मूलन समिती करणार तक्रार - टाकळी ढोकेश्वर येथील कोविड केअर सेंटर
पारनेर तालुक्यातील भाजप नेते सुजित झावरे यांनी कोरोना महामारीतून सुटका व्हावी, रुग्णांना आराम मिळून ते बरे व्हावेत म्हणून एका विश्वशांती यज्ञाचे आयोजन केले होते. टाकळी ढोकेश्वर गावात माजी आमदार दिवंगत वसंतराव झावरे कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.भाजप नेते सुजित झावरे यांनी याच कोविड केअर सेंटर मध्येच विश्वशांती यज्ञ आयोजित केला होता.