ETV Bharat / state

अण्णांच्या मागण्यांसाठी उच्चाधिकार समिती; आंदोलन होणार नाही, महाजनांना विश्वास

अण्णा हजारे हे ३० जानेवारीपासून राळेगणमध्ये आंदोलनाला बसणार होते. केंद्र सरकारविरोधातील हे आंदोलन टाळण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी आज राळेगणमध्ये येऊन अण्णांची भेट घेतली. तसेच अण्णांच्या मागण्याबाबत केंद्राचा प्रस्ताव अण्णांपुढे ठेवला आहे.

अण्णांच्या मागण्यांसाठी उच्चाधिकार समिती

author img

By

Published : Jan 28, 2021, 1:34 PM IST

Updated : Jan 28, 2021, 1:39 PM IST

अहमदनगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे येत्या ३० जानेवारी पासून आपल्या कृषी मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. अण्णांनी हे आंदोलन करू नये यासाठी भाजपाचे नेते प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने आज (गुरुवारी) सकाळीच माजी मंत्री आणि भाजप सरकार मधील संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी मध्ये अण्णांची भेट घेत केंद्र सरकारने नव्याने दिलेला प्रस्ताव अण्णांसमोर सादर केला.

अण्णांच्या मागण्यांसाठी उच्चाधिकार समिती

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नी अण्णा हजारे यांनी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या संदर्भात आज अण्णांसोबत झालेली चर्चा सकारात्मक झाली आहे. तसेच अण्णांनी मागणी केलेली उच्चाधिकार समिती गठीत होऊन तातडीने अण्णांनी केलेल्या मागणीवर तत्काळ निर्णय होणार आहे, त्यावरील नवीन प्रस्ताव उद्याच (शुक्रवारी) अण्णांना सादर केला जाईल. त्यामुळे आंदोलनाची वेळ अण्णांवर येणार नाही, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्राच्या प्रस्तावासह केंद्रीय कृषी राज्यमंत्री राळेगणमध्ये येणार-

या वयात अण्णांनी आंदोलन करू नये म्हणून पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांना काळजी आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री उद्या (शुक्रवारी) केंद्राचा प्रस्ताव घेऊन स्वतः येतील याचे सुतोवाच महाजन यांनी केले आज या भेटीनंतर केले. प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचाराचा महाजन यांनी यावेळी निषेध केला.

Last Updated : Jan 28, 2021, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.