अहमदनगर - महाराष्ट्रात महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यातील विविध जिल्हा परिषदा तसेच महापालिकेत महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी सत्ता मिळवत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. मात्र, आता महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपनेच महाविकास आघाडीला 'धोबीपछाड' देत आपल्या उमेदवाराला विजयी केले आहे.
हेही वाचा... रांजणगावमध्ये कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीसोबत अश्लील वर्तन, मुंबईत गुन्हा दाखल
महापालिकेतील प्रभाग क्रमांक '6 अ' मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार पल्लवी जाधव यांनी शिवसेनेच्या उमेदवार अनिता दळवी यांचा एक हजार 712 मतांनी दारुण पराभव केला. महापौरांच्या प्रभागातच ही निवडणूक रंगल्याने महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरली. जाधव यांच्या विजयाने आता महापौरांच्या या प्रभागात चारही नगरसेवक भाजपचे झाले आहेत आणि हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला ठरत आहे.
हेही वाचा... अंधश्रद्धा : पैशांचा पाऊस पाडून विधवा महिलांवर अत्याचार