ETV Bharat / state

Biometric pass Sai Baba Temple: आता भक्तांना थेट साई मंदिरात जाता येणार.. बायोमेट्रिक पास व्यवस्था होणार बंद - बायोमेट्रिक पास साई मंदिर शिर्डी

शिर्डीत आल्यानंतर भाविकांना साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जाण्यासाठी दोन वेळा रांगेत तिष्ठत उभे राहण्यास भाग पाडणारी बायोमेट्रिक पास ( Biometric pass shirdi Sai Baba Temple ) व्यवस्था येत्या एक एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Biometric pass system stop shirdi sai baba temple
बायोमेट्रिक पास साई मंदिर शिर्डी
author img

By

Published : Mar 27, 2022, 2:02 PM IST

अहमदनगर - शिर्डीत आल्यानंतर भाविकांना साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जाण्यासाठी दोन वेळा रांगेत तिष्ठत उभे ( Biometric pass Shirdi Sai Baba Temple ) राहण्यास भाग पाडणारी बायोमेट्रिक पास व्यवस्था येत्या एक एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साई संस्थान विश्वस्त मंडळाने घेतलेल्या या निर्णयाने भाविकांना आता थेट साई मंदिरात जाता येणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

Biometric pass system stop shirdi sai baba temple
बैठकीचे दृश्य

हेही वाचा - Devendra Fadnavis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : देवेंद्र फडणवीस

शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने श्रीरामनवमी उत्सवानिमित्ताने बैठख घेतली होती. या बैठकीत भाविकांच्या सुविधेसाठी विविध निर्णय घेतले आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले भाविक साईबाबांचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू घेऊन जातात. हा प्रसाद चवदार करण्यासाठी सरकारी नियमाप्रमाणे गावरान तुपाची खरेदी आणि अभिषेक व सत्यनारायण पूजा पूर्ववत सुरू करण्याचे महत्त्वाचे निर्णय साई संस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आले, अशी माहिती साई संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

श्री रामनवमी उत्सवासाठी 95 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. त्यातील 21 लाख रुपये यात्रेसाठी दिले जातील. साई संस्थानच्या प्रसादालयात तयार करण्यात येणारे लाडू चवदार व्हावेत, यासाठी लाडू तयार करण्याची स्पर्धा भरविली जाईल. त्यातून चांगले आचारी निवडले जातील. गावरान तूप खरेदी बाबतच्या तक्रारी लक्षात घेता सरकारी नियमाप्रमाणे खरेदी केली जाईल. तसेच, या तुपाची आधी तपासणी देखील केली जाईल. द्वारावती इमारती समोरील उद्यान खुले केले जाणार असल्याची माहिती काळे यांनी दिली.

हेही वाचा - Shirdi Rangpanchami : शिर्डीत रंगपंचमीचा उत्साह; साईबाबांच्या रथाची मिरवणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.