ETV Bharat / state

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती; 15 दिवसांत प्रकल्प कार्यन्वित

कोविड सेंटर करिता व इतर रुग्णालयांतकरिता लागणारा ऑक्सिजन साखर कारखान्यात तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी तातडीने तैवान येथून स्कीड माऊंटेड ऑक्सिजन प्लांटची खरेदी करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत हा ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती
कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती
author img

By

Published : May 1, 2021, 2:16 PM IST

संगमनेर (अहमदनगर)- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 500 बेडचे अद्यावत कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटर करिता व इतर रुग्णालयांतकरिता लागणारा ऑक्सिजन साखर कारखान्यात तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी तातडीने तैवान येथून स्कीड माऊंटेड ऑक्सिजन प्लांटची खरेदी करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत हा ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले की, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोना संकटात जनसामान्यांना सातत्याने मोठी मदत केली आहे. त्यांच्यावर राज्यात प्रशासनाची मोठी जबाबदारी असतानाही अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची काळजी घेताना कोरोना रुग्णांना औषधे, ऑक्सीजन याचबरोबर चांगल्या सुविधा देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. ही कोरोना वाढ कमी करण्यासाठी तालुक्यात घरोघर तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी राज्य पातळीवरील वरिष्ठ स्तरावरून त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून ऑक्सिजन मिळवला आहे.

दररोज 1 टन 190 किलो ऑक्सिजन निर्मिती

संगमनेर येथील नगर रोडवरील विघ्नहर्ता लॉन्स येथे थोरात कारखान्याने 500 बेडचे अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. तसेच रुग्णालयांकरीता लागणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणेसाठी कारखाना व्यवस्थापनाने ऑक्‍सिजन निर्मिती करणार आहे. या प्लांटमधून 7 घनमीटर क्षमतेची दैनंदिन 85 ऑक्सिजन सिलिंडर भरले जाऊ शकणार आहेत. यातून दररोज 1 टन 190 किलो ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. यामुळे कोविड केअर सेंटर तसेच इतर रुग्णालयांकरता होणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणार आहे. हा उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरणार आहे.

पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्चही देणार-

बाळासाहेब थोरात यांनी या कोरोना संकटात कृतिशीलतेतून अनेक धोरणात्मक निर्णय घेताना नागरिकांना दिलासा दिला आहे. याचबरोबर स्वतःचे एक वर्षाचे मानधन सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. तसेच अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांमधील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्चही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला जाणार आहे. तालुक्‍यातील ऑक्सिजनची गरज भागवण्याकरीता विविध ऑक्सिजन रिफिलिंगच्या समस्या सोडवत मोठी मदत करून ऑक्सिजन मिळवला आहे.

कोरोना संकटात कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीसाठी अत्यंत तातडीने तैवान येथून या प्लंटची खरेदी केली असून येत्या पंधरा दिवसात हा प्लंट उभा करून यातून ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. हा उपक्रम राज्याला आदर्शवत ठरणार असून कारखान्याच्या या निर्णयाबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब थोरात, अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे,सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे तालुक्यातील नागरिकांमधून अभिनंदन होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.