ETV Bharat / state

कांद्याला भाव मिळत नसल्याने भरत जाधव यांनी नैराश्यातून केले विष प्राशन - Attempted suicide of onion grower

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील टाकळीभान उपबाजार समितीमध्ये ( Taklibhan Sub Market Committee ) भरत जाधव यांनी कांद्याला भाव मिळत नसल्याने विष प्राशन केले ( Attempted suicide of onion grower ) आहे.

Bharat Jadhav ate poison
भरत जाधव यांनी नैराश्यातून केले विष प्राशन
author img

By

Published : May 16, 2022, 4:18 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खिर्डी गावातील भरत जाधव या तरुण शेतकऱ्याने टाकळीभान येथील उपबाजार समितीमध्ये ( Taklibhan Sub Market Committee ) विष प्राशन केल्याची घटना घडली ( ) आहे. २५ टन कांदे घेऊन भरत जाधव हा टाकळीभान येथील उपबाजार समितीमध्ये विकण्यासाठी आले होतो. अडत्याकडे त्यांनी कांदा दिल्या नंतर त्यांना फक्त एक रुपया किलोचा भाव मिळाला. यामुळे भारत निराश आणि हताश झाल्याने त्यांनी बाजार समिती मध्येच विष प्राशन केल्याची घटना घडली ( Attempted suicide of onion grower ) आहे.

बाजार समितीमध्ये विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली होती. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी भरतला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. विष प्राशन केल्यानंतर त्याला इतर सहकाऱ्यांनी श्रीरामपूर येथील साखर कारखान्याच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. या ठिकाणी त्याची मृत्यूशी झुंज चालू आहे.

भरत जाधव यांनी नैराश्यातून केले विष प्राशन

शेतकऱ्यांना पिकांना मिळत असलेल्या कमी भावामुळे अनेक शेतकरी अशाप्रकारे आपले जीवन संपवत आहेत. मात्र राज्यात सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून हनुमान चालीसा भोंगे आणि धर्म यावरच राजकारण सुरू आहे. शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. डोक्यावर असलेल्या कर्ज घरातील इतर समस्या कशा सोडवायच्या असा मोठा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे.

एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करून शेतकरी कांदा पिकवतो आणि त्याला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्याचे स्वप्न धुळीस मिळतात आणि अखेर शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो मात्र अजूनही याबाबत राज्य सरकार किंवा केंद्र सरकार गंभीर होत नाही ही मोठी शोकांतिका आहे.

हेही वाचा - ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरखाली सापडल्याने शेतकर्‍याचा जागीच मृत्यू, कराडमधील वाघेरी येथील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.