अहमदनगर - कालपर्यंत पक्षात येणाऱ्यांचा आमच्याशी संपर्क नव्हता मात्र, आज सकाळपासून अनेकांचे फोन येत असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. ही जागा जाहीर करु नका ती जागा जाहीर करु नका, अशी मागणी केली जातेय. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये येण्यास अनेकजण इच्छुक असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.
काँग्रेस पक्ष निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयार आहे. आमच्या उमदेवारांची जवळपास नावे तयार झालेली आहेत. गेल्या ५ वर्षात काँग्रेसचे काम राज्यात सुरु होते. आम्हीही दोनदा यात्रा काढल्या आहेत. अनेक प्रश्नांवरुन आंदोलन केली आहे. या सरकारकडे एक अपयशी सरकार म्हणून बघीतले जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. युवकांच्या रोजगाराचा प्रश्न तसाच आहे. जनतेत नाराजीचा सुर आहे. त्यामुळे जनता आमच्या बरोबर राहील असेही थोरात यावेळी म्हणाले.
हेही वाचा - दिवाळीपूर्वीच निवडणुका; २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ला मतमोजणी
हेही वाचा - शिवसेना ५० टक्केच्या फॉर्म्युलावर ठाम, भाजप-सेना जुळे भाऊ - संजय राऊत
भाजाप शिवसेनेची युती होवो न होवो आम्ही निवडणुका लढविण्यास तयार आहोत. त्यांच्या युती होण्याचा न होण्याचा आम्हाला काय फायदा होईल याचा विचार करत नसल्याचे थोरात म्हणाले. युती करताना शिवसेना काहीही सहन करायला तयार असल्याचे दिसत आहे. सेना कुठेतरी बँक फुटवर गेल्याचे दिसून येत आहे. हे त्यांच्यासाठी चांगले नसल्याचेही थोरात म्हणाले. राज्यातील प्रचारासाठी राहुल गांधी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधा, प्रियंका गांधी यांनी यावं ही कार्यकर्त्यांची भावना आहे. आम्ही त्यांना आग्रह करणार असल्याचे थोरात म्हणाले.