शिर्डी (अहमदनगर) - राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील शेतकरी राधुजी चव्हाण यांच्या अडीच एकर बागेतील निर्यातक्षम द्राक्षांचा 32 रुपये किलो दराने सौदा झाला होता. मात्र, द्राक्षांचे वजन सहन करू न शकल्याने सहाय्यक तारा तुटल्या आणि संपूर्ण बागच उद्ध्वस्त झाली. हातातोंडाशी आलेला घास निघून गेल्याने शेतकऱ्याला आपले आश्रू आवरणे कठीण झाले. लॉकडाऊनमुळे आधीच द्राक्ष बागायतदार शेतकरी वैतागला असून त्यात या शेतकऱ्यावर असे संकट ओढावले.
संक्रापूर येथील शेतकरी राधुजी चव्हाण यांनी चार वर्षांपूर्वी द्राक्ष बाग लावली होती. या बागेला आधार देण्यासाठी तारा लावण्यात आल्या होत्या. तारांना तशी दहा वर्षाची गँरंटी असताना चौथ्या वर्षी द्राक्ष बागेतील तार तुटल्यामुळे या शेतकऱ्याची अख्खी बागच जमीनदोस्त झाली. यामुळे शेतकऱ्याची पंधरा लाख रुपयांची तयार झालेली द्राक्षे व बागेचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले. या शेतकऱ्याला आधी लॉकडाऊनमुळे भाव मिळाला नव्हता, आता भाव मिळाला तर असे नुकसान झाले. नुकसानीस केवळ तार कंपनीच जबाबदार असल्याचे मत शेतकरी चव्हाण यांनी व्यक्त केले असून तार कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी चव्हाण यांनी केली आहे.
सहाय्यक तारा तुटल्या आणि संपूर्ण द्राक्ष बाग कोसळली, शेतकऱ्याचे मोठे नुकसान शेतकरी राधुजी चव्हाण - शिर्डीच्या बातम्या
द्राक्षांचे वजन सहन करू न शकल्याने सहायक तारा तुटल्या आणि संपूर्ण बागच उद्ध्वस्त झाली. हातातोंडाशी आलेला घास निघून गेल्याने शेतकऱ्याला आपले आश्रू आवरणे कठीण झाले. लॉकडाऊनमुळे आधीच द्राक्ष बागायतदार शेतकरी वैतागला असून त्यात या शेतकऱ्यावर असे संकट ओढावले.