संगमनेर (अहमदनगर) Shirdi Congress President : शिर्डी काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चौघुले आणि नगरसेवक सुरेश आरने यांच्यावर काही अज्ञात इसमांनी लोणी येथे प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. हे दोघं संगमनेर तालुक्यातील आश्वी येथून शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यावरून परतत होते.
रॉडनं बेदम मारहाण : संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे रिपब्लिकन नेते गायकवाड यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. या सोहळ्याला शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमावरून परतत असताना ७-८ हल्लेखोरांनी सचिन चौघुले आणि सुरेश आरने यांची गाडी लोणी येथे अडवली. त्यांनी या दोघांवर प्राणघातक हल्ला करत रॉडनं बेदम मारहाण केली. या हल्ल्यात चौघुले यांच्या गाडीचंही मोठं नुकसान झालाय.
दोघांना रुग्णालयात दाखल केलं : हल्ल्यानंतर चौघुले आणि आरने यांना जखमी अवस्थेत संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी घटनास्थळी पोहचत तपास सुरू केला. हल्ल्यातील गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र अशा प्रकारे एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीला भररस्त्यात मारहाण झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
हे वाचलंत का :