अहमदनगर: मुकुंदनगर परिसरात राहणाऱ्या साबीर शेखला भिंगारनाला परिसरात अटक करण्यासाठी आलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आरोपीसह त्याचे अन्य दोन साथीदार देखील घटनास्थळी दिसले. त्याचवेळी पोलिसांनी सगळ्यांवरच धाड टाकली होती. मात्र, त्यातून दोन जण फरार होण्यात यशस्वी झाले होते. परंतु पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
सापळा रचला आणि चौघे अडकले : स्थागुशा पथक अहमदनगर शहर व परिसरात फिरून आरोपींची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सय्यद (रा. मुकुंदनगर, अहमदनगर) हा त्याचे पाच साक्षीदारासह काळ्या रंगाची बॅग व पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये बेकायदेशीर हत्यारे घेऊन येणार आहे, असे कळले. याआधारे दिनेश आहेर यांनी भिंगार नाला परिसरात सापळा रचला. दरम्यान, सहा इसम पायी येताना दिसले. त्यापैकी एकाच्या हातात काळ्या रंगाची बॅग व दुसऱ्या एका इसमाच्या हातात पांढऱ्या रंगाची गोणी दिसून आली. पथकाची खात्री होताच त्यांच्यावर अचानक छापा टाकून चार इसमांना जागीच ताब्यात घेतले; मात्र दोन इसम पळून गेले.
इतक्या हजारांचा मुद्देमाल जप्त : पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे साबीर अस्लम सय्यद (वय १९), समी शेख (वय १९), अजहर गफ्फार शेख (वय २०) आणि एक विधीसंघर्षित बालक आहेत. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडून तलवार, गुप्ती आणि दहा सुरे असा एकूण ८,०००/- हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. आरोपींकडे पळून गेलेल्या इसमांची नाव व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे आयान समिर खान (फरार) व सौरभ कथुरीया (फरार, दोन्ही रा. मुकुंदनगर, अहमदनगर) असे सांगितले.
शिक्षणाच्या वयात शस्त्रांची तस्करी : ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द पोलीस कर्मचारी भिमराज किसन खसे यांचे फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पो.स्टे. गु.र.नं. ३०६ / २३ आर्म एक्ट क. ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहे. आरोपींची वय पाहता 19-20 वर्षे आहेत. शिक्षण घेण्याच्या वयात त्यांच्याकडून शस्त्रसाठा प्राप्त झाल्याने पोलिसांना देखील आश्चर्य वाटत आहे. त्यामुळे सापडलेला शस्त्रसाठा आणि आरोपी मुलांची वये या विषयावर शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा: