ETV Bharat / state

मोहिनीराज यात्रा महोत्सवाला सुरूवात, दिव्यांनी उजळले मंदिर - ardhanari nateshwar mohini

दशावतारात एकमेव असलेल्या अवतारावर राक्षसच नव्हे, तर भगवान शंकरही भाळले होते. खंडोबा अवतारामध्ये पार्वतीने म्हाळसा मोहिनीचेच रूप घेऊन जन्म घेतला. अमृतमंथनानंतर निघालेले अमृत केवळ देवांनाच मिळावे यासाठी विष्णूने मोहिनी अवतार घेत राक्षसांना मोहिनी घातली. अशी अख्याइका आहे.

ardhanari nateshwar mohiniraj yatra started in nevasa
मोहिनीराज यात्रा महोत्सवाला सुरूवात, लाखो दिव्यांनी उजळले मंदिर
author img

By

Published : Feb 3, 2020, 8:41 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील नेवासा येथे विष्णूच्या दशावतारांपैकी मोहिनी अवताराचे जगातील एकमेव मंदिर आहे. या मोहिनीराज मंदिराच्या यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली असून महिलांनी लावलेल्या नंदादीप आणि समईच्या प्रकाशात मंदिर उजळुन निघाले आहे. दरम्यान, ही यात्रा १५ दिवस चालणार आहे.

मोहिनीराज मंदिर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचलेल्या प्रवरा नदीतिरावरील नेवासा शहरात आहे. हे मंदिर अहिल्यादेवी होळकरांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधले आहे. हेमाडपंथी मंदिराचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिरातील मूर्तीचे अर्धे शरीर पुरुषाचे व अर्धे स्त्रीचे आहे.

दशावतारात एकमेव असलेल्या अवतारावर राक्षसच नव्हे, तर भगवान शंकरही भाळले होते. खंडोबा अवतारामध्ये पार्वतीने म्हाळसा मोहिनीचेच रूप घेऊन जन्म घेतला. अमृतमंथनानंतर निघालेले अमृत केवळ देवांनाच मिळावे यासाठी विष्णूने मोहिनी अवतार घेत राक्षसांना मोहिनी घातली. अशी अख्याइका आहे.

मोहिनीराज मंदिराच्या यात्रा महोत्सव प्रसंगी महिलांनी दिवे लावून केलेली सजावट....

दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवाची सुरूवात रथसप्तमीपासून होते. यात दररोज भगवत कथा आणि विविध धार्मिक कार्यक्रम होतात. यातील संबळाच्या निनादात सादर होणारा देवीचा भळंद हा कार्यक्रम पाहण्यासाठी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.

रात्री विविध भक्तांनी मंदिरात लावलेल्या नंदादीप आणि समईच्या प्रकाशाने मंदिर उजळुन निघाले आहे. यात्रा काळात ५ दिवस महाप्रसादाचे आयोजन प्रथापरंपरेनुसार करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारीला यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी मोहिनीराज पालखीद्वारे मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी यात्रेचा गोपाळकाला होणार आहे. त्याच दिवशी रात्री १० नंतर उत्सव मूर्तीची शहरातून मिरवणूक निघणार आहे.

Intro:

ANCHOR_ अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा येथे विष्णुच्या अर्धनारी नटेश्वर रुपातील भारतातील एकमेव मंदीर आहे या मोहिनीराज मंदीराचा यात्रा उत्सव पंधरा दिवस चालतो महीलांनी लावलेल्या नंदादीप आणि समईच्या प्रकाशात मंदीर उजळुन निघाले आहे...

VO_मोहिनीराज मंदिरातील मूर्ती अर्धनारीनटेश्वरची असल्याने देशात हे एकमेव मंदिर आहे. मोहिनीराज मंदिर न्यानेश्वरांना न्यानेश्वरी रचीलेल्या प्रवरा तीरावरील नेवासा शहरात आहे.समूद्र मंथना नंतर अमूत वाटपासाठीच्या पंगती येथे बसल्या होत्या अशी अख्याईका आहे त्या वेळीविष्णुंनी अमूत वाटपा साठी स्रीच अर्थात मोहनीच रुप घेतल होत त्याचच प्रतिक असलेल्या अर्धनट नारीश्वराचे मंदीर येथे बांधण्यात आल होत. प्रतीवर्षा येथे मोठा यात्रा उत्सव भरतो पंधरा दिवस चालणार्या या यात्रा उत्सवाची सुरवात रथ सप्तमी पासुन होते यात दररोज भागवत कथा आणि विवीध धार्मिक कार्यक्रम होतात यातील संबळाच्या निनादात सादर होणारा देवीचा भळंद कार्यक्रम बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येथे येत असतात. रात्री विवीध भक्तांनी मंदीरात लावलेल्या नंदादिप आणि समाईच्या प्रकाशाने मंदीर उजळुन निघले होते...यात्रा काळात पाच दिवस महाप्रसादाचे आयोजन प्रथापरंपरेनुसार केल जाणार आहे...14 फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून येथील मोहिनीराज मंगल कार्यालयामध्ये दुपारी महाप्रसाद त्या नंतर उत्सव मूर्तींचे श्री मोहिनीराज मंदिराकडे पालखीद्वारे वाजत गाजत मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी यात्रेचा गोपाळकाला होणार आहे. त्याच दिवशी रात्री १० नंतर उत्सवमूर्तीची शहरातून मिरवणूक निघणार आहे...दरम्यान यात्रेसाठी विविध राज्यातून भाविक यात्रा काळात भेट देतात.यात्रा कालावधीत विविध मंडळ, ग्रामस्थ मंदिरावर वाजत गाजत झेंडा चढवतात....

BITE_कुलकर्णी गिरीष मंदिर पुजारी Body:mh_ahm_shirdi_mohaniraj yatra_3_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_mohaniraj yatra_3_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.