अहमदनगर - राज्यात अतिवृष्टी, लांबलेला पाऊस आणि पुरपरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशावेळी सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. ते अहमदनगर येथे बोलत होते.
हेही वाचा - बागलाण तालुक्यात पावसामुळे पीकाचे नुकसान, शेतकऱ्याची आत्महत्या
आपल्या देशाला आपण कृषीप्रधान देश म्हणतो. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी आत्महत्या करत असतील तर सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी आग्रही मागणी अण्णांनी केली आहे.
हेही वाचा - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छीमारांना लवकर मदत द्या, आदित्य ठाकरेंची राज्यपालांना विनंती