अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पासून (20 डिसेंबर) आपल्या राळेगणसिद्धी गावातील यादव बाबा मंदिरामध्ये मौनव्रत आंदोलन सुरू केले आहे. दिल्ली निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही सहा वर्षे उलटल्यानंतर अजूनही फाशी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा -'लोकांना वारंवार स्वतःच नागरिकत्व सिध्द करावं लागणं हेच क्लेशदायक''
हजारे म्हणाले, "देशामध्ये अनेक ठिकाणी महिला आणि युवतींवर बलात्कार आणि जाळून मारण्यासारखे क्रूर घटना होत आहेत. याबाबत सरकारने पावले दिरंगाईची असल्याचं आणि त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रक्रिया आणि पुढे शिक्षा सुनावल्यानंतर शिक्षेस होणारा अक्षम्य विलंब यावर उद्विग्न झालेल्या अण्णांनी आजपासून मौनव्रत आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटकावले जात नाही तोपर्यंत आपण मौनव्रत आंदोलन करणार आहोत. मात्र, यातही विलंब होताना दिसल्यास आपण उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला आहे.
निती आयोग, मुख्यमंत्र्यांची आणि संसद सदस्यांची जबाबदारी यावर अण्णांनी नाराजी व्यक्त करतानाच न्यायालयीन प्रक्रिया आणि सरकारने याबाबत पावले चालवीत यावर अपेक्षा व्यक्त केली आहे.
हेही वाचा -मिटकरींची संधी हुकली? राष्ट्रवादीकडून 'या' दोन सदस्यांची विधानपरिषदेवर वर्णी