ETV Bharat / state

Sun Pharma Fire Ahmednagar : सन फार्मा कंपनीच्या प्लांटला आग, एका कर्मचाऱ्याचा झाला मृत्यू

शहराजवळ मनमाड रोडवरील नागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीच्या एका प्लांटला बुधवार रात्री नऊच्या सुमारास अचानक आग लागली. (Fire Sun Pharma's plant ) या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लॅंट असून आतील एका प्लाॅंन्टला ही आग लागली. ही नेमकी कशामुळे लागली हे उशिरापर्यंत समजू शकले नाही. या आगीत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

सन फार्मा कंपनीच्या प्लांटला लागलेल्या आगीत कर्मचाऱ्याचा मृत्यू

author img

By

Published : Dec 9, 2021, 8:56 AM IST

Updated : Dec 9, 2021, 3:27 PM IST

अहमदनगर - शहराजवळ मनमाड रोडवरील नागापूर एमआयडीसीतील ( Sun Pharma Company Nagpur MIDC ) सन फार्मा कंपनीच्या एका प्लांटला बुधवार रात्री नऊच्या सुमारास अचानक आग लागली. या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लॅंट असून आतील एका प्लाॅंन्टला ही आग लागली. ( An Employee Dies Fire Sun Pharma's plant ) ही नेमकी कशामुळे लागली हे उशिरापर्यंत समजू शकले नाही. या आगीत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

सन फार्मा कंपनीच्या प्लांटला आग, एका कर्मचाऱ्याचा झाला मृत्यू
एका कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू

आग विजवल्यानंतर त्याचा मृतदेह तेथून हलवण्यात आला. सन फार्मा या कंपनीला लागलेली आग मोठी असल्याने यात मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. आग विझवण्यासाठी एमआयडीसी, महापालिकेतील अग्निशमन बंबांनी शर्थीचे प्रयत्न केले. सन फार्मा या औषधांच्या कंपनीत तीन लिक्विडचे प्रकल्प आहेत.

चार तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात-

याच प्रकल्पाशेजारील रुमला प्रथम आग लागली असून ती कंपनीत पसरली होती. आग विझवण्यासाठी पाच अग्निशमन बंब दाखल झाले होते. काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी कंपनीमध्ये दोन रुग्णवाहिकाही दाखल करण्यात आल्या होत्या.

अग्निशमन दल, पोलीस तातडीने घटनास्थळी

सात नंबरच्या प्लांटजवळ दोन कर्मचाऱ्यांची ड्युटी होती. त्यातील एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. दुसरा कर्मचारी सुखरूप असल्याचे समजते. दरम्यान, आगिची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, एमआयडीसीचे सहायक निरीक्षक युवराज आठरे फौजफाट्यासह दाखल झाले आहेत. त्याचबरोबर महापालिकेचे विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांनी देखील कंपनीत धाव घेतली. एमआयडीसी, अहमदनगर आणि राहुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम केले.

हेही वाचा - Sanjay Raut Meets Priyanka Gandhi : प्रियांका गांधींची भेट घेतल्यानंतर संजय राऊत म्हणाले...

Last Updated : Dec 9, 2021, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.