अहमदनगर : अमरावतीहून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या तब्बल शंभर विद्यार्थांना फुड पॉइजनिंग झाल्याची घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथिल आदर्श हायस्कूल येथील हे विद्यार्थी आहेत. दोन दिवसापासून ते सहलीसाठी निघले होते. शिर्डीत येण्यापुर्वी दुपारचे जेवन केले. त्यानंतर साई बाबांचे दर्शन घेतले. रात्री देवगड येथे मुक्कामी निघले असताना मुलांना उलट्या आणि जुलाब सुरु झाले. यातील काही विद्यार्थांना अधिक त्रास जाणवत होता. त्यामुळे शिक्षकांनी सर्व मुलांना रात्री शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
शंभर मुलांना त्रास : यातील काही मुलांना ताप, थंडी सारखे प्रकार देखिल दिसून आले. त्यामुळे खबरदारी म्हणून रुग्णालयाने सर्व विद्यार्थांना देखरेखी खाली ठेवले आहे. महत्वाचे म्हणजे मुलांनी बाहेर कुठे काही खाल्ले नसल्याचे शिक्षक सांगत आहेत. जेवन तयार करण्याची सामुग्री सोबतच असल्याचे सांगितले जात आहे. तर पाणी बदलामुळे उलट्या सुरु होवून फूड पॉइजनींग सारखा प्रकार असल्याचे शिक्षक सांगत आहेत. मुलांची प्रकृती स्थिर असून सर्व बाधित मुलांना सध्या रुग्णालायत दाखल ठेवले आहे. सहलीत 227 विद्यार्थी आहेत. यातील शंभर मुलांना त्रास झाला आहे. तर काही शिक्षकांना देखिल अन्न विषबाधा सारखी लक्षणे जाणवल्याने त्यांना ही उपचारासाठी दाखल केले आहे. सविस्तर माहिती थोड्याच वेळात.