ETV Bharat / state

नागपूरचं बोचकं परत नागपूरला पाठवा, अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

नागपूरचं बोचकं परत नागपूरला पाठवा, अन् महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
author img

By

Published : Oct 17, 2019, 10:24 AM IST

Updated : Oct 17, 2019, 10:31 AM IST

अहमदनगर - नागपूरचं बोचकं परत नागपूरला पाठवा, अन् महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आपल्याकडे शाळेत नापास झाले की बापाला बोलावले जाते. तशीच अवस्था सध्या मुख्यमंत्र्यांची झाली आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळेच मोदी-शाह महाराष्ट्रात येत असल्याचा टोमणा कोल्हेंनी लगावला.

अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

हेही वाचा - 'म्हशीपेक्षा रेडकू मोठा कसा?', शिखर बँकप्रकरणी अजित पवारांची भाजपवर टीका

हेही वाचा - 'दहा रुपयांची भीक टाकण्याइतका महाराष्ट्र भिकारी झाला नाही'

कर्जत - जामखेडच्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी येथे आलेले पार्सल परत पाठवा, अशी रोहीत पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले. कर्ज जामखेड मतदारसंघाचे उमेदवार रोहीत यांच्या प्रचारार्थ आयोजीत मिरजगाव येथील सभेत कोल्हे बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यासह सरकारवर जोरदार निशाणा साधला. गेल्या ५ वर्षांची स्वतःचीच कारकीर्द पाहून मुख्यमंत्र्यांना प्रश्न पडला असेल, की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे. त्यामुळे नागपूरचे बोचकं परत नागपूरला पाठवा, अशी खोचक टीका कोल्हेंनी केली.

पदाचा आदर मात्र, गडी कसाच पैलवान दिसत नाही
मुख्यमंत्री पदाचा आदर आहे. मात्र, फडणवीस हे पुढून मागून कसेही बघितले तर पैलवान दिसत नसल्याचे वक्तव्य अमोल कोल्हेंनी केले. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र, आमच्यासोबत लढायला कोणीच नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. या वक्तव्याला कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले.

Intro:अहमदनगर- नागपूरच बोचक नागपूरला पाठवायच..-खा. कोल्हे
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_ncp_kolhe_rally_vij_7204297

अहमदनगर- नागपूरच बोचक नागपूरला पाठवायच..-खा. कोल्हे

अहमदनगर- मुख्यमंत्री कर्जत-जामखेड मधे येऊन म्हणतात की इथे आलेले पार्सल परत पाठवायच, कदाचित गेल्या पाच वर्षांची स्वतःचीच कारकीर्द पाहून त्यांनाच प्रश्न पडला असेल की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे, त्यामुळे हे नागपूरचे बोचक परत नागपूरला पाठवायचे आहे, आणि आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यायचे आहे, असा घणाघात खा. अमोल कोल्हे यांनी केलाय. कर्जत-जामखेड मधील राष्ट्रवादी चे उमेदवार रोहित पवार यांच्या मिरजगाव येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे टीकास्त्र सोडले.. आपल्याकडे शाळेत नापास झाले की बापाला बोलावले जाते,तशीच अवस्था सध्या मुख्यमंत्र्यांची झालीय, म्हणून राज्य सरकारच्या नाकर्तेपणा मुळे मोदी-शहा महाराष्ट्रात येत असल्याचा टोमणा त्यांनी लगावला.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर
Conclusion:अहमदनगर- नागपूरच बोचक नागपूरला पाठवायच..-खा. कोल्हे
Last Updated : Oct 17, 2019, 10:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.