ETV Bharat / state

Akole Long March : अकोले येथून निघालेल्या लॉंग मार्चचा दुसरा दिवस; मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, तीन मंत्री आंदोलकांच्या भेटीला येणार - Labor Minister and Tribal Development Minister

सरकारकडे विविध मागण्या घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून बुधवारी निघालेला लाॅंग मार्च आज रात्री संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात मुक्कामी आहे. शेतकरी, कामगार आणी आदिवासी बांधवांसह हजारो लोक या आंदोलनात सहभागी आहेत. आज लाॅंग मार्चचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांनी या लाॅंग मार्चची तात्काळ दखल घेतली आहे.

AKole Long march
अकोले लाँग मार्च
author img

By

Published : Apr 27, 2023, 10:29 AM IST

Updated : Apr 27, 2023, 3:30 PM IST

अहमदनगर : आज राज्य सरकारमधील किमान तीन मंत्री आंदोलकांच्या भेटीला संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात येणार आहे. ते आंदोलकांशी मागण्यांबाबद चर्चा करणार आहे. तोवर हा लाॅंन्गमार्च धांदरफळ गावातच थांबणार आहे. मंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार आहे. आज महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह कामगार मंत्री आणी आदिवासी विकास मंत्री आंदोलकांच्या भेटीला येणार असल्याची माहीती आहे.

राज्यव्यापी पायी मोर्चा : नैसर्गिक आपत्ती आणि राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मूलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे आणि विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेले आहेत. अखेर जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणे अनिवार्य झाले आहे. याकरिता अकोले ते लोणी असा जबरदस्त राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.

नुकसान भरपाई देण्याच्या घोषणा : राज्यात मागील दोन हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे उद्धस्त झाली. सरकारने या पिकांना नुकसान भरपाई देण्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र कोठेही मदत करण्यात आली नाही. प्रत्यक्षात जमीन नावे करण्याऐवजी पोलीस व वन विभागाचा दुरुपयोग करत गरीब श्रमिकांना अमानुषपणे मारहाण करून घरे व जमिनींवरून हुसकावून काढण्याच्या मोहिमा राबविल्या गेल्या. जबरदस्तीने व अत्यल्प मोबदला देत शेतकऱ्यांच्या जमिनी, रस्ते, कॉरीडोर, विमानतळ व तथाकथित विकासकामांसाठी हडप केल्या जात असल्याची खंत डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली.

दुग्ध उत्पादकांचे जगणे कठीण : कोविड संकटात १७ रुपये लिटरप्रमाणे दूध विकावे लागल्याने हतबल झालेले दूध उत्पादक आता थोडे व्यवसायात पुन्हा उभे राहू लागले आहेत. अशातच पुन्हा एकदा केंद्र सरकारने दुग्धपदार्थ आयात करण्याच्या हालचाली सुरू करून दुग्ध उत्पादकांचे जगणे कठीण केले आहे. या पार्श्वभूमीवर दूध, कापूस, सोयाबीन, हिरडा, तूर, हरभरा यासारख्या पिकांना रास्त भावाची हमी, दुग्धपदार्थ आयात करून दुधाचे भाव पाडण्यास विरोध, जमीन अधिग्रहणास योग्य मोबदला, शेतकऱ्यांना व निराधारांना पेंशन यासह इतर मागण्यांसाठी राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात आला आहे.

हेही वाचा : Kisan Long March : लाल वादळातील शेतकऱ्याच्या मृत्यूनंतरही आंदोलक मागण्यांवर ठाम

Last Updated : Apr 27, 2023, 3:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.