ETV Bharat / state

अजिंक्य रहाणेच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू - rahanes maternal uncle died

मंगळवारी राजेंद्र गायकवाड हे शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी पाय घसरुन विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला

rajendra gaikwad
राजेंद्र गायकवाड
author img

By

Published : May 21, 2020, 1:02 PM IST

अहमदनगर- भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य राहाणे यांच्या मामांचे मंगळवारी एका दुर्घटनेत निधन झाले. संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र राधाकृष्ण गायकवाड असे रहाणे यांच्या मामाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी विहिरीत पाय घसरुन पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मंगळवारी गायकवाड हे शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. बराच वेळ होऊनही ते घरी न आल्याने कुटुंबातील व्यक्तींनी शोधा-शोध सुरू केली. यावेळी शेतातील विहिरीत त्यांना गायकवाड यांचा मृतदेह आढळून आला. यानतंर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानतंर बुधवारी शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले आहे.

दरम्यान, राजेद्रं गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ, भावजय, तीन बहिणी, मेव्हणे व वडील असा मोठा परिवार आहे. येथील प्रसिद्ध डॉक्टर गणेश गायकवाड यांचे ते बंधु होते. त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.