ETV Bharat / state

​​​​​​​अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी - test  successfull

गर-बीड-परळी या महत्वकांक्षी रेल्वे मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. नगर ते नारायणडोह या २५ किलोमीटर मार्गाच्या यशस्वी चाचणीनंतर नारायण डोह ते आष्टी (जि-बीड) तालुक्यातील सोलापूरवाडी या २३ किलोमीटर रेल्वेमार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

रेल्वेमार्गाची यशस्वी चाचणी
author img

By

Published : Mar 2, 2019, 12:18 PM IST

अहमदनगर - नगर जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजले जाते. औरंगाबाद, बीडसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी अहमदनगर जिल्हातील मार्ग महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे नगर-बीड-परळी या महत्वकांक्षी रेल्वे मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. नगर ते नारायणडोह या २५ किलोमीटर मार्गाच्या यशस्वी चाचणीनंतर नारायण डोह ते आष्टी (जि-बीड) तालुक्यातील सोलापूरवाडी या २३ किलोमीटर रेल्वेमार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

रेल्वेमार्गाची यशस्वी चाचणी

अहमदनगर जिल्ह्यातून बीड परळी हा रेल्वेमार्ग एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. पुढे हाच मार्ग अहमदनगर मार्गे माळशेज रेल्वे या नावाने कल्याणकडे मार्गस्थ करावा, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. हा संपूर्ण मार्ग झाल्यास बीड, नगर, पुणे आणि कल्याण, असा सोईचा मार्ग तयार होणार आहे. सध्या नगरपासून बीड ते परळी या मार्गाचे काम सुरू आहे. पहिल्या २५ किलोमीटरच्या नगर-नारायणडोह मार्गानंतर नारायणडोह ते सोलापूरवाडी हा २३ किलोमीटर मार्ग पूर्ण करण्यात आला आहे.

चाचणी वेळी रल्वे तब्बल १२० किलोमीटर वेगाने धावली. यशस्वी चाचणीनंतर सोलापूरवाडी येथे एका छोटेखानी कार्यक्रमात रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या रेल्वे मार्गावर जी गावे येतात या गावातील नागरिक चाचणीच्या वेळी उत्सुकतेने उपस्थित होती.

रेल्वे विभागाने घेतलेल्या चाचणीत रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन, मुख्य प्रशासकीय अधिकारी एस के तिवारी, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, विभागीय रेल्वे व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा, उपमुख्य अभियंता चांदरभूषण, कार्यकारी अभियंता पडळकर, विद्याधर धांडे आदी उपस्थित होते. यशस्वी चाचणीच्या निमित्ताने अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करून आनंद साजरा केला. आता सोलापूरवाडी पासून पुढील तिसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे रेल्वेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

undefined

Intro:अहमदनगर- नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाची दुसऱ्या टप्याची यशस्वी चाचणी..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाची दुसऱ्या टप्याची यशस्वी चाचणी..

अहमदनगर- नगर जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजले जाते. औरंगाबाद, बीड सह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसह पुणे नागपूरलाही जाण्यासाठी नगर जिल्हा हाच महत्त्वाचा मार्ग समजला जात असतो. आता याच नगर जिल्ह्यातून रेल्वेमार्गाने मराठवाड्यात प्रवेश करता येणार असून नगर-बीड-परळी या महत्वकांक्षी रेल्वे मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. नगर ते नारायणडोह या 25 किलोमीटरच्या मार्गाच्या पुर्ततेनंतर नारायण डोह ते आष्टी (जि-बीड) तालुक्यातील सोलापूर वाडी या 23 किलोमीटरच₹च्या रेल्वेमार्गाची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातून बीड परळी हा रेल्वेमार्ग एक महत्त्वकांक्षी प्रकल्प असून पुढे हाच मार्ग नगर मार्गे माळशेज रेल्वे या नावाने कल्याणकडे मार्गस्थ करावा अशी संपूर्ण परिसरातील नागरिकांची मागणी आहे. हा संपूर्ण मार्ग झाल्यास बीड, नगर, पुणे आणि कल्याण असा महत्त्वपूर्ण मार्ग बनणार आहे. सध्या नगरपासून बीड ते परळी या मार्गाचे काम रेल्वेच्या माध्यमातून सुरू आहे. पहिल्या 25 किलोमीटरच्या नगर-नारायणडोह मार्गा नंतर नारायणडोह ते सोलापूरवाडी या 23 किलोमीटर मार्ग पूर्ण करण्यात आला आहे. या नवीन मार्गाची चाचणी तब्बल 120 किलोमीटर वेगाने रेल्वेने पार करत रेल्वे विभागाच्या मजबूत तंत्रज्ञानाची अनुभुती दिली. यशस्वी चाचणीनंतर सोलापूर वाडी येथे एका छोटेखानी कार्यक्रमात रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. या रेल्वे मार्गावरील जी गावे येतात या गावातील नागरिक या चाचणीच्या वेळी रेल्वे मार्गावर उत्सुकतेने उपस्थित होती. रेल्वे विभागाने घेतलेल्या चाचणीत रेल्वे सुरक्षा आयुक्त ए.के. जैन, मुख्य प्रशासकीय अधिकारी एस के तिवारी, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, मंडल रेल प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा, उपमुख्य अभियंता चांदरभूषण, कार्यकारी अभियंता पडळकर, विद्याधर धांडे आदी उपस्थित होते यावेळी यशस्वी चाचणी च्या निमित्ताने अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करून आनंद साजरा केला. आता सोलापूर वाडी पासून पुढील तिसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे रेल्वेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाची दुसऱ्या टप्याची यशस्वी चाचणी..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.