ETV Bharat / state

मानधनवाढीसाठी अहमदनगर आशा सेविकांचा जिल्हापरिषदेवर एल्गार

author img

By

Published : Sep 4, 2019, 2:42 AM IST

ग्रामीण भागातील आरोग्यसेवेत मोठी भूमिका बजावणाऱ्या आशा सेविकांनी मानधनवाढीबाबत अहमदनगर जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन केले. सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मागणी मान्य करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा ईशारा आंदोलनकर्त्या सेविकांनी दिला.

मानधनवाढीसाठी अहमदनगर आशा सेविकांचा जिल्हापरिषदेवर एल्गार

अहमदनगर - आशा सेविकांनी मंगळवारी एकत्र येत जिल्हापरिषद कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यात मानधनवाढीची प्रमुख मागणी होती. 'आम्ही मागतो कष्टाचं नाही कुणाच्या बापाचं', 'दहा हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे' अशा घोषणा देत यावेळी संपूर्ण जिल्हापरिषद कार्यालय आशा सेविकांनी दणाणून सोडले. हे आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

हेही वाचा - जळगाव घरकुल घोटाळ्याचे तपास अधिकारी सिंधू यांचे अण्णांकडून अभिनंदन

ग्रामीण भागातील आरोग्यसेवेत मोठी भूमिका बजावणाऱ्या आरोग्यसेविकेंच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची भावना राज्यभरात आहे. मानधन वाढीचा प्रश्न गेले अनेक महिने रेंगाळत असून संप आणि आंदोलन झाल्यानंतर सरकार आश्वासन देण्यापलीकडे काहीच करत नसल्याचे आंदोलनकर्त्या सेविका म्हणत होत्या. त्यामुळे यापुढे आश्वासन नको तर निर्णय हवा अशी मागणी सेविकांनी केली.

हेही वाचा - चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

जिल्ह्यातील अनेक तालुके हे दुर्गम आणि काही आदिवासी भागातील आहेत. अशा ठिकाणी आरोग्यसेवा देण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. त्यातच सरकारच्या वेगवेगळे सर्व्हे आणि आरोग्य विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवाव्या लागतात. एवढे करूनही सरकार आमची कुचेष्टा करत असल्याचे या आशा सेविकांचे म्हणणे आहे. सरकार आमच्या अनेक प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे, यात मानधनवाढीचा प्रश्न महत्वाचा आहे. शासनाने मानधनवाढीबाबत आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच निर्णय घेऊन आदेश काढावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलनाचा ईशारा त्यांनी दिला.

हेही वाचा - आरोग्य सेविकांना करावी लागणार प्रतीक्षा.. न्यायालयाच्या निर्णयानंतरच पालिका कर्मचाऱ्यांचा दर्जा

Intro:अहमदनगर- मानधनवाढी साठी आशा सेविकांचा जिल्हापरिषदेवर धरणे आंदोलन..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_asha_sevika_protest_vij_7204297

अहमदनगर- मानधनवाढी साठी आशा सेविकांचा जिल्हापरिषदेवर धरणे आंदोलन..

अहमदनगर- जिल्ह्यातील आशा आरोग्य सेविकांनी आज एकत्र येत जिल्हापरिषद कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यात माणधनवाढीची प्रमुख मागणी होती. आम्ही मागतो कष्ठाच नाहीं कुणाच्या बापाचे.. दहा हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे.. अशा घोषणां देत यावेळी संपूर्ण जिल्हापरिषद कार्यालय आशा सेविकांनी दणाणून सोडले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ग्रामीण आरोग्यसेवेत मोठी भूमिका बजावणाऱ्या आरोग्यसेविकेंच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना राज्यभरात आहे. मानधन वाढीचा प्रश्न गेले अनेक महिने रेंगाळत असून शासन संप,आंदोलन झाल्या नंतर आश्वासन देण्या पलीकडे काही करत नसून यापुढे आश्वासन नको तर निर्णय हवा अशी मागणी करत आज अहमदनगर जिल्हा परिषद कार्यालया समोर जिल्ह्यातील शेकडो आशा आरोग्य सेविकांनी धरणे आंदोलन केले. नगर जिल्ह्यातील अनेक तालुके हे दुर्गम आणि काही आदिवासी भागातील आहेत. या ठिकाणी आरोग्यसेवा देण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. मात्र शासनाचा उपक्रम आणि समाजसेवा या भावनेतून काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र शासन आमच्या अनेक प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे, यात माणधनवाढीचा प्रश्न महत्वाचा आहे. शासनाने माणधनवाढी बाबत आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेऊन आदेश काढावा या अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिख6आशा आरोग्य सेविका या आंदोलनात मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर. Conclusion:अहमदनगर- मानधनवाढी साठी आशा सेविकांचा जिल्हापरिषदेवर धरणे आंदोलन..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.