ETV Bharat / state

Electric Vintage Car : विद्यार्थ्याने बनवली बॅटरीवर चालणारी कमी खर्चातील इलेक्ट्रिक विंटेज कार

वाढत्या इंधन दर वाढीमुळे मोठमोठ्या कंपन्या आता इलेक्ट्रीक टेक्नॉलॉजीकडे वळाल्या आहेत. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील मॅकेनिकलच्या अंतिम वर्गात शिकणारा शेतकरी कुटुंबातील युवराज पवार या युवकाने अगदी कमी खर्चात बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक विंटेज कार त्याने विकसित केली ( student built battery powered electric vintage car ) आहे. परराज्यातून त्याला कारसाठी ग्राहक मिळत असून सोशल माध्यामांचा वापर करत तो आता आपले नशीब आजमावत आहे.

Electric Vintage Car
इलेक्ट्रिक विंटेज कार
author img

By

Published : May 26, 2022, 6:07 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील निंभारी या खेडेगावात राहणारा युवराज पवार हा युवक मॅकेनिकलच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. देशात कोरोना संकट आणि आर्थिक मंदी असल्यामुळे नोकऱ्यांना बसत चाललेली खिळ लक्षात घेवून या युवकाने उद्योजक होण्याचा निर्धार केला आहे. आपल्या वडिलांच्या लहानशा वर्कशॉपमध्ये लहानपणापासून युवराज काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असे. नवनवीन अत्याधुनिक शेती अवजारे तयार केल्याने वडिलांनी देखील त्याला पाठबळ दित होते. त्यांने यातून प्रेरणा घेऊन आता इलेक्ट्रिक विंटेज कार बनवली ( student built battery powered electric vintage car ) आहे.

युवराज पवार व त्याच्या आईची प्रतिक्रिया

इलेक्ट्रिक विंटेज कार - लॉकडाऊनच्या मागील दोन वर्षात त्याने सुरुवातीला पेट्रोलवर चालणाऱ्या दोन विंटेज कारची निर्मिती केली. या कारला त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तो इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीकडे वळाला आहे. साधारण दोन महिने परिश्रम घेत त्याने 'पवार ब्रदर्स हिस्टोरिकल मोटार' या नावाने 'युवराज 3.0' ही इलेक्ट्रिक विंटेज कार तयार केली आहे.

कारची डिझाईन इंग्रजाच्या काळातील वाहनांसारखी - रस्त्यावर धावताना लक्झरी कारमधील व्यक्तीच्या देखील माना आपोआप मागे वळतात. प्रथमदर्शनी अगदी मनात भरणारी, अशी या कारची डिझाईन आहे. लोस्पीड आणि हायस्पीड अशा दोन वेगात ती धावू शकते. एकाच वेळी चार व्यक्ती अगदी आरामात या कारमध्ये बसून प्रवास करु शकतात. हेडलाईट, पार्किंग, वळण्यासाठी इंडिकेटर, स्टॉप इंडिकेटर अशा सुविधा यात देण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे बॅटरी बचत व्हावी म्हणून एलईडी लाइट्स यात वापरण्यात आले आहे. करमणुकीसाठी साऊंड सिस्टम देखील यात आहे. जमिनीपासून 222 सेमीचे अंतर असल्याने कुठल्याही रस्त्यावर धावण्यासाठी पुरिपुर्ण आहे. कारची डिझाईन इंग्रजाच्या काळातील वाहनांसारखी आहे. तर या कारचे पेटेंट त्याने नोंदवले आहे.

सर्वसामान्यांसाठी राजा-महाराजांचा फिल - जवळपास शंभर वर्षापूर्वी राजा महाराज तसेच गर्भ श्रीमंत व्यक्तींकडे अशा कार दिसत असे. देशात अगदी तुरळक व्यक्तींकडे कार असल्याने एक वेगळी छाप होती. सध्याच्या काळात काही शौकीन व्यक्तींकडे विंटेज कार दिसून देतात. यात बड्या असामींनी आपल्या कारच्या संग्रहात विंटेज कार ठेवल्या आहेत. मात्र आता युवराजच्या या कार निर्मितीमुळे हे फिल सर्वसामान्य व्यक्तीला देखील मिळू शकणार आहे. अत्यंत कमी किमतीत आणि सर्व सामान्य व्यक्तींना परवडेल, अशी या कारची किंमत असून दैनंदिन वापरता सुध्दा तीचा वापर करणे सहज शक्य आहे.

युवराज पवार आपल्या कार विषयी माहिती देतांना सांगतो की, मी साधारण दोन महिन्यात एक कार करतो. सुरुवातीला पेट्रोल इंजिनवर धावणाऱ्या विटेंज कार तयार केल्या. मात्र अलीकडे पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यामुळे सध्या इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीकडे वळतो आहे. एक कार तयार करताना साधारण दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. सुरुवातीला हौस आणि छंद म्हणून काम करत होता. मात्र आता कार विकत घेण्यासाठी ग्राहक उपलब्ध होवू लागले आहे. तेव्हा मी अशा कार तयार करत आहे. सध्या युवराज 3.0 ही मध्यप्रदेशमधील ग्राहकाने खरेदी केली आहे. यात लिथियम बॅटरी असून चार युनिटमध्ये तीन तासांत फुल चार्ज होते. ज्यात 110 किमी पर्यंत चालते. स्लो स्पीडमध्ये वेग 25 किमी तर हाय स्पीडमध्ये 70 किमीच्या वेगाने कार रस्त्यावर धावते.

युवराजची आई गितांजली पवार ह्या देखील ही कार अगदी सहज चालवतात. इतर कोणतेही वाहन त्यांना चालवता येत नाही. शिक्षण कमी असल्याने आणि त्यातच ग्रामीण भाग त्यामुळे कारच्या ड्राईव्हिंग सीटवर बसण्याची संधी त्यांना मिळाली नाही. मात्र मुलाचे कर्तृत्व पाहून त्यांनी ही कार चालवली. आपल्या मुलाचा अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लवकरच चालत्या कारमध्ये बॅटरी रिचार्ज होण्याची टेक्नॉलॉजी विकसीत करणार असल्याचा दावा युवराजने केला आहे. युवराज या प्रयत्नात यशस्वी झाला तर हा प्रयोग आमूलाग्र अन क्रांतिकारी ठरणार आहे. यामुळे प्रयोगामुळे निश्चित ई-कारकडे ग्राहकांचे आकर्षण आणखी वाढेल. तर त्यातून वेळ, पैशाची बचत आणि प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

हेही वाचा - NCP Agitation In Thane : राष्ट्रवादीने जाळला चंद्रकांत पाटील यांचा पुतळा, प्रतिमेला जोडे मारत महिलांनी केले आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.