ETV Bharat / state

अहमदनगर : कोरोनामुळे शनीअमावस्या यात्रा रद्द; शनिशिंगणापूर देवस्थानचा निर्णय - अहमदनगर शनिशिंगणापूर लेटेस्ट न्यूज

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्रच वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शनिशिंगणापूर देवस्थानने येत्या 12 आणि 13 मार्च (शुक्रवारी-शनिवारी) रोजी साजरा होणारा शनी अमावस्या यात्राउत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देवस्थानचे पुजारी आणि मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित शनी अमावस्ये निमित्ताने होणारे धार्मिकविधी, आरत्या केल्या जातील.

ahmednagar shani amavas utsav cancled
अहमदनगर शनी अमावस्या यात्रा उत्सव रद्द
author img

By

Published : Mar 10, 2021, 12:12 PM IST

Updated : Mar 10, 2021, 12:49 PM IST

अहमदनगर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्रच वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शनिशिंगणापूर देवस्थानने येत्या 12 आणि 13 मार्च (शुक्रवारी-शनिवारी) रोजी साजरा होणारा शनी अमावस्या यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अहमदनगर शनी अमावस्या यात्रा उत्सव रद्द

हेही वाचा - सोलापूर : मोहोळ तुरुंगातील 13 कैद्यांना कोरोनाची लागण

भक्तांमध्ये शनिवारी येणाऱ्या अमावस्येला महत्त्व

शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनिशिंगणापूरमध्ये यात्रोत्सव साजरा केला जातो. वर्षातून केवळ दोन ते तीन वेळेसच असा योग येत असल्याने शनिभक्त ही पर्वणी साधून देशभरातून शनिशिंगणापूरला येऊन शनिमूर्तीचे दर्शन घेतात. या दिवशी शनिमूर्तीस अभिषेक केल्यास साडेसाती असणाऱ्यांना मोठा फायदा होतो अशी भाविकांची भावना असल्याने चार ते पाच लाख भाविक शनी अमावस्या पर्वात दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. यानिमित्ताने शनी मूर्तीस सजवले जाते तसेच विशेष आरतीचे संयोजन केले जाते.

कोरोनामुळे यात्राउत्सव रद्द

येत्या 12 मार्च (शुक्रवारी)रोजी दुपारी तीन वाजून दोन मिनिटांनी अमावस्येला प्रारंभ होत असून शनिवारी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी अमावस्या काल संपत आहे. या कालावधीत शनी भक्त मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. देवस्थाने एकूणच राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वाढती रुग्ण संख्या आणि यात्राउत्सवात कोरोनाचा संसर्ग वाढू शकत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार शनीअमावस्या यात्राउत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र देवस्थानचे पुजारी आणि मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित शनी अमावस्येनिमित्ताने होणारे धार्मिक विधी, आरत्या केल्या जातील.

हेही वाचा - कोरोनाचा खोटा अहवाल घेऊन विमान प्रवासाचा प्रयत्न, ३ व्यक्तींवर एफआयआर दाखल

Last Updated : Mar 10, 2021, 12:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.