ETV Bharat / state

अपहरण झालेले करीमभाई हुंडेकरी सापडले... तपास सुरू - अपहरण झालेले करीमभाई हुंडेकरी पोलिसांना सापडले

व्यावसायिक म्हणून परिचित असलेले करीमभाई हुंडेकरी आज(सोमवार) सकाळी नमाज पठणासाठी जात असताना त्यांचे काही अज्ञात लोकांनी बळजबरीने चारचाकी वाहनातून अपहरण केले होते.

करीमभाई हुंडेकरी पोलिसांना सापडले
author img

By

Published : Nov 18, 2019, 8:46 PM IST

Updated : Nov 18, 2019, 9:06 PM IST

अहमदनगर - नगर शहरातील सर्वपरिचित प्रसिद्ध व्यावसायिक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी आठ तासाच्या आत अपहरण झालेले करीमभाई यांना प्रसारमध्यमांपुढे आणण्यात यश आले आहे. मात्र, एकंदरीत या प्रकरणावर पोलिसांनी तपासाचा भाग सांगत अनेक गोष्टी पत्रकारांपुढे स्पष्ट न केल्याने या अपहरण प्रकरणाचे गूढ कायम आहे.

अपहरण झालेले करीमभाई हुंडेकरी पोलिसांना सापडले

हेही वाचा - अहमदनगर : निघोज कुंडावर आढळला महिलेचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह

व्यावसायिक म्हणून परिचित असलेले करीमभाई हुंडेकरी आज(सोमवार) सकाळी नमाज पठणासाठी जात असताना काही अज्ञात लोकांनी बळजबरीने चारचाकी वाहनातून त्यांचे अपहरण केले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार हुंडेकरी यांना अपहरणकर्त्यांनी नगरहून जालना येथे नेले. तिथे त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी एसटी बस पकडून नगरकडे निघाले. वाटेत त्यांनी सहप्रवाशांच्या मोबाईल फोनवरून घरी संपर्क करून येत असल्याचे कळवले. त्यानंतर पोलिसांनी नगरजवळ जेऊर टोलनाक्यावरून त्यांना थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले. या ठिकाणी त्यांच्याकडून पोलीस घटनाक्रमाची अधिक माहिती घेत आहेत.

हेही वाचा -पिस्तुलाचा धाक दाखवत अहमदनगरचे उद्योजक करीमभाईंचे अपहरण

दरम्यान, सकाळपासून शहरात या प्रकरणाने सुरू झालेली खळबळ शांत झाली असून नेमके हे अपहरण प्रकरण काय आहे याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Intro:अहमदनगर- अपहरण झालेले कारीमभाई हुंडेकरी पोलिसांना सापडले.. तपास सुरू.
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_kidnap_case_solv_vis:7204297

अहमदनगर- अपहरण झालेले कारीमभाई हुंडेकरी पोलिसांना सापडले.. तपास सुरू.

अहमदनगर- नगर शहरातील सर्वपरिचित प्रसिद्ध व्यावसायिक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी आठ तासाच्या आत अपहृत हुंडेकरी यांना प्रसारमध्यमांपुढे आणण्यात यश आणले आहे. मात्र एकंदरीत ह्या प्रकरणावर पोलिसांनी तपासाचा भाग सांगत अनेक गोष्टी पत्रकारांपुढे स्पष्ट न केल्याने या अपहरण प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
वाहनविक्री व्ययसायासह अनेक व्यवसायात अग्रगण्य व्यावसायिक म्हणून परिचित असलेले करीमभाई हुंडेकरी आज सकाळी नमाज पठणासाठी जात असताना त्यांचे काही अज्ञात लोकांनी बळजबरीने चारचाकी वाहनातून अपहरण केले होते.
सूत्रांच्या माहिती नुसार हुंडेकरी यांना अपहरणकर्त्यांनी नगरहून जालना इथे नेले, तिथे त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी एसटी बस पकडून नगर कडे निघाले वाटेत त्यांनी सहप्रवाशाच्या मोबाईल फोनवरून घरी संपर्क करून येत असल्याचे कळवताच पोलिसांनी नगर जवळ जेऊर टोलनाक्यावरून त्यांना थेट जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले. या ठिकाणी त्यांच्या कडून पोलीस घटनाक्रमाची अधिक माहिती घेत आहेत. एकंदरीत सकाळपासून शहरात या प्रकरणाने सुरू झालेली खळबळ शांत झाली असून नेमके हे अपहरण प्रकरण काय आहे याबद्दल नागरिकांत उत्सुकता निर्माण झाली आहे..
(बाईट- सागर पाटील -अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक)

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- अपहरण झालेले कारीमभाई हुंडेकरी पोलिसांना सापडले.. तपास सुरू.
Last Updated : Nov 18, 2019, 9:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.