ETV Bharat / state

रेखा जरे हत्याकांड : सूत्रधार बोठे विरोधात अन्य कारवाईसाठी पोलिसांचा विचार सुरू

author img

By

Published : Dec 21, 2020, 7:03 PM IST

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. यामुळे बोठेविरोधात अन्य काही कारवाई करता येईल का, याचा विचार पोलीस करत आहेत. मात्र, याबाबत अधिकृतपणे पोलिसांनी दिलेली नाही.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडाचा संशयित सूत्रधार पत्रकार बाळ बोठे सापडत नसल्याने त्याच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार अन्य काही कारवाई करता येईल का, याचा विचार पोलिसांनी सुरू केला आहे. अर्थात पोलिसांकडून याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले जात नाही. या हत्याकांडाप्रकरणी अटक आरोपीकडून बोठे हा मुख्य सूत्रधार असल्याचे पुढे आल्यानंतर तब्बल वीस दिवसांनंतरही त्याचा शोध पोलीस लावू शकलेले नाहीत, अशात आता पोलिसांच्या शोधकार्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. पण, शोध घेऊनही बोठे सापडत नसल्याने त्याच्याविषयी चुकीची माहिती मिळत का, तसेच त्याच्याविरुद्ध अन्य कोणती कायदेशीर कारवाई करता येईल व तिचा काही उपयोग होईल काय, यादृष्टीने पोलिसांनी विचार सुरू केला.

पोलिसांकडून तपासाबाबत चुप्पी

अन्य कारवाई काय असेल, हे मात्र गुलदस्त्यात असून प्रत्यक्ष कारवाईनंतरच ते स्पष्ट होण्याची शक्यताही यातून दिसू लागली आहे. याबाबत सध्या तपासी अधिकारी किंवा इतर वरिष्ठ अधिकारी अधिकृतपणे माध्यमांशी बोलण्यास तयार नाहीत. तपास सुरू असल्याचे साचेबद्ध उत्तर सध्या दिले जात आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील पसार आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा पोलिसांना अद्यापपर्यंत छडा लागलेला नाही. दुसरीकडे आता पुढील कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अंतर्गत तयारीही सुरू केली आहे. पोलिसांनी केलेल्या बोठेविषयी माहिती देण्याच्या आवाहन पोलिसांनी केले होते. यास काहींनी चांगला प्रतिसाद देत माहितीही दिली. पण, त्याचा ही काहीच फायदा पोलिसांना झाला नाही. यामुळे माहिती देणारेच पोलिसांची दिशाभूल तर करत नसतील ना, अशी शंका उपस्थित होत आहे.

वीस दिवसानंतरही बोठे पोलिसांना सापडेना

जरे हत्याकांडाला वीस दिवस उलटले. अद्यापर्यंत या हत्याकांड प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना अजूनही यश आले नाही. अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार बोठे याच्या घराची दोनवेळा झडती घेतली होती. अनेक वस्तू या ठिकाणी आढळून आल्या होत्या. त्यादृष्टीने त्याचाही तपास सुरू झालेला आहे. त्यातच त्याचा एक फोनही पोलिसांच्या हाती लागला. त्यासंदर्भात सुद्धा आता तपास सुरू केला आहे. बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता त्याच्याकडून उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी तयारी सुरू असू शकते. त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये हा जामीन अर्ज दाखल होतो का, हे पाहावे लागणार आहे. आरोपीचा शोध न लागल्यामुळे आता पोलिसांनी त्याच्याविरुद्ध इतर कारवाई काय करता येईल काय, या दृष्टिकोनातून पाऊले उचललेली आहेत. त्यादृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या असल्याचे बोलले जात आहे.

तपासासाठी पाच पथके कार्यरत

या संदर्भामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांची पाच पथके जिल्ह्यासह राज्यात त्याचा शोध घेत आहेत. अद्यापपर्यंत पसार आरोपीचा शोध लागलेला नाही. मात्र, काही निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. पण, आताच त्याबाबतची माहिती देता येणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - शेवगाव नगरपरिषद प्रशासनाविरोधात मुंडण आंदोलन

हेही वाचा - 'ऑनालइन बुकींग' करुनच भाविकांनी साईंच्या दर्शनास यावे, संस्थानचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.