अहमदनगर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या गावात बाळासाहेब विखे पाटिल यांच्या हस्ते सोमवारी सेना-भाजप युतीच्या जनसंपर्क कार्यालय आणि एका माहिती सुविधा केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
सेना-भाजप युतीच्या जनसंपर्क आणि माहिती सुविधा केंद्राचे उद्घाटन आज संगमनेर येथे होणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर येथील सेना भाजप पदाधिकाऱ्यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक घेणार आहेत. तसेच 18 तारखेला मुख्यमंत्र्यांची ‘महाजनादेश यात्रा याच तालुक्यातून जाणार आहे. यामुळे विखेंच्या संगमनेर दौऱ्याला विशेष महत्व आहे. दरम्यान थोरातांना राज्यातील काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सावरायचीच आहे पण आपला गडदेखील सुरक्षित ठेवावा लागणार आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसला स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रदेशाध्यपदी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक महिन्याभरापूर्वी काँग्रेसने केली आहे. पण प्रदेशाध्यक्षांच्याच गडाला सुरुंग लावण्याची तयारी त्यांचे कट्टर विरोधक विखे पाटील पिता पुत्रांनी सुरु केली आहे. गृहराज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित आज सोमवारी बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात म्हणजेच संगमनेर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.