ETV Bharat / state

Ahmednagar Murder Case: मजुरीचे पैसे मागितल्याचा राग; चौघांनी एका मजुराला संपवलं.... - दगडाने मारहाण

Ahmednagar Murder Case: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील येसगावात एक धक्कदायक घटना घडली आहे. गवंडी कामाची मजुरी मागितल्याच्या कारणातून एका मजुराची हत्या करण्यात आली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Ahmednagar Murder Case
चौघांनी मजुराला संपवलं
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 3:13 PM IST

अहमदनगर (शिर्डी): Ahmednagar Murder Case: कोपरगाव तालुक्यातील येसगावात गवंडी कामाची मजुरी मागितल्याच्या कारणातून वाद झाला. गावातील चौघांनी एका मजुराला लाथा बुक्क्यांनी दगड तसेच लाकडी दांड्याने मारहाण करुन हत्या केल्याची घटना (Murder Case) मवारी संध्याकाळी घडली. दिपक दादा गांगुर्डे (वय ४०) असे मयत मजुराचे नाव आहे. यादरम्यान घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दिपक गांगुर्डे यास ग्रामीण रूग्णालय येथे दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद : दिपकची पत्नी जया गांगुर्डे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येसगाव तालुका कोपरगाव येथील दीपक दादा गांगुर्डे (वय 40 वर्ष) धंदा मजुरी ( गवंडी काम ) राहणार येसगाव तालुका कोपरगाव याचे आरोपी उषा सुनील पोळ, स्नेहा सुनील पोळ, राज उर्फ बबलू सुनील पोळ, अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड सर्व राहणार येसगाव यांना गवंडी कामाचे मजुरीचे राहिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून आरोपींनी त्याचा राग येऊन तिघांनी शिवीगाळ केली. त्याला लाथा बुक्क्याने तसेच दगडाने मारहाण केली. आरोपी अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड याने लाकडी दांड्याने दिपकच्या डोक्यात तसेच शरीरावर ठीक ठिकाणी मारहाण करून जबर जखमी करून खून केला आहे.

तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : फिर्यादी व फिर्यदीच्या भावाला शिवीगाळ दमदाटी करून धक्काबुक्की केली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात आरोपी उषा सुनील पोळ, स्नेहा सुनील पोळ, राज उर्फ बबलू सुनील पोळ, अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड सर्व राहणार येसगाव तालुका कोपरगाव यांच्या विरोधात 441/2023 भादवि कलम 302, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल करीत आहे.

हेही वाचा -

  1. Murder in Thane : ठाण्यात गँगवॉर? प्रतिस्पर्धी टोळीकडून अल्पवयीन गुन्हेगाराचे अपहरण करून खून
  2. Thane Murder News: 'या' संशयातून मालकानं केली कामगाराची हत्या, मृतदेह फेकला झाडाझुडपात
  3. Minor Girl Murder Thane: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.