अहमदनगर - येथील महिलेसह तिच्या पतीलाही विवस्त्र करून मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ करून तो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला आहे. हा अमानूष प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणात एकूणच पोलिसांची संशयित बाजू असल्याचा आरोप पीडितेच्या पतीने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिसांऐवजी राज्य गुन्हे अन्वेषण शाखा अर्थात 'सीआयडी'कडे द्यावा, अशी मागणी पीडितेच्या पतीने केली आहे.
दरम्यान, 2016 मध्ये पीडितेवर बलात्कार झाल्यानंतर आतापर्यंत दोनवेळेस आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र, यामध्ये पोलिसांनी आम्हाला नेहमीच धमकी देण्याचा आणि गुन्हा मागे घ्या, असे सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपी पेक्षा जास्त दबाव आमच्यावर पोलिसांकडून आल्याचा आरोप पीडितेच्या पतीने केला आहे. त्यामुळे आता हा तपास पोलिसांऐवजी सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी पीडितांनी केली आहे.
यासंदर्भातल्या सर्व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा -
'अहमदनगर अत्याचार प्रकरणी गृहमंत्र्यांनी आजच्या आज उत्तर द्यावे'
समाजाची मानसिकता का बदलतेय ? अहमदनगरच्या 'त्या' घटनेचा आमदार भारती लव्हेकरांकडून निषेध
अहमदनगर पीडिता आणि पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन अज्ञात पोलिसांसह दहा जणांवर गुन्हा दाखल