ETV Bharat / state

नगरला मुसळधार पावसाने झोडपले, रस्ते जलमय... - ahamadnagar

अहमदनगरमध्ये वादळीवाऱ्यासह आगमन झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शहराला काही मिनिटातच ओलेचिंब केले. त्यामुळे कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली.

नगरला धुवादार पावसाने झोडपले, रस्ते जलमय...
author img

By

Published : Jun 13, 2019, 10:10 PM IST

अहमदनगर - राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. त्याच प्रमाणे गुरुवारी सांयकाळी शहरातदेखील जोरदार पावसाचे आगमन झाले. वादळीवाऱ्यासह आगमन झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शहराला काही मिनिटातच ओलेचिंब केले. त्यामुळे कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली.

विजेचा कडकडाटासह शहरात जोरदार पाऊसझाला. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे रूप आले आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

नगरला धुवादार पावसाने झोडपले, रस्ते जलमय...

दरम्यान, आज पडलेल्या जोरदार पावसाने हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक या सुखद वातावरणाचा आनंद घेत आहेत. दीड-दोन तासांच्या पावसानंतर सूर्य-नारायणाने अस्ताला जाण्यापूर्वी दर्शन दिले. यामुळे एक वेगळाच माहोल तयार झाला होता. ऊन-पावसाचा हा खेळ डोळ्यात साठवण्यासारखा मनमोहक होता. मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी मान्सून पावसाच्या आगमनाची आस सर्वांनाच लागली आहे.

Intro:अहमदनगर- नगरमध्ये धुंवादार पाऊस, पावसाने झोडपले..रस्ते जलमय..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_nagar_city_rain_2019_vij1_7204297

अहमदनगर- नगरमध्ये धुंवादार पाऊस, पावसाने झोडपले..रस्ते जलमय..

अहमदनगर- आज सांयकाळी पाच नंतर नगर शहरात जोरदार पावसाचे आगमन झाले. वादळीवाऱ्यासह आगमन झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शहराला काही मिनिटांत ओलेचिंब केले. त्यामुळे कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली तर बच्चे कंपनीने या पावसाचा आनंद लुटत ओलेचिंब भिजणे पसंत केले.. विजेचा कडकडाटाच्या आवाजा जोरदार बरसणार्या जलधारांनी काही वेळातच शहर पाणीमय झाले.. शहरातील सर्वच रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे रूप आले. या रस्त्यावरून वाहने नेताना वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहनचालकांना वाहन चालवताना कसरती कराव्या लागत आहेत.. मात्र एकूणच आज पडलेल्या जोरदार पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिक या सुखद वातावरणाचा आनंद घेत आहे. दीड-दोन तासांच्या पावसानंतर लागलीच सुर्यनारायणनाने आपल्या अस्ताला जाण्यापूर्वी दर्शन देत एक वेगळाच माहोल तयार केला.. ऊन-पावसाचा हा खेळ डोळ्यात साठवण्यासाठी मनमोहक असाच होता..आता प्रत्येक्षात मान्सूनच्या पावसाच्या आगमनाची आस सर्वानाच2आहे..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- नगरमध्ये धुंवादार पाऊस, पावसाने झोडपले..रस्ते जलमय..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.