ETV Bharat / state

Haregaon News : शेळी चोरल्याच्या संशयातून मागासवर्गीय तरुणांना झाडाला उलटं बांधून मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल - Backward Class Youths Beaten

शेळी चोरल्याच्या संशयातून मागासवर्गीय तरुणांना मारहाण केल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे शुक्रवारी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा समाजकंटकांवर गुन्हा दाखल केला आहे. या समाजकंटकांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

Haregaon News
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 11:32 AM IST

Updated : Aug 27, 2023, 2:39 PM IST

शेळी चोरल्याच्या संशयातून चार तरुणांना मारहाण

शिर्डी : शेळी चोरल्याच्या संशयातून मागासवर्गीय तरुणांना झाडाला उलटं बांधून मारहाण करण्यांविरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांकडून युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शेळी चोरल्याच्या संशयातून चार तरुणांना मारहाण केल्यामुळे दोन गटात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

  • शेळी आणि कबुतर गेलं चोरीला : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील नाना गलांडे याची शेळी आणि काही कबुतरं काही दिवसापूर्वी चोरीला गेले होते. या शेळीचा शोध घेऊनही ती आढळून न आल्यानं नाना गलांडे आणि त्याच्या साथिदारानं गावातील काही तरुणांवर शेळी चोरीचा आळ लावला होता.

झाडाला उलटं लटकवून तरुणांना मारहाण : शेळी आणि कबुतरं चोरीच्या संशयावरून शुक्रवारी सकाळी चार मागासवर्गीय तरूणांना त्यांच्या घरातून उचलून नेण्यात आलं होतं. या तरुणांना कपडे काढून झाडाला उलटं लटकवून आरोपी युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे यांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीत तरुणांना शेळीची चोरी केल्याबाबतची माहिती वदवून घेण्यात आली. मात्र तरुणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पीडित तरुणाच्या आईला धक्काबुक्की : शेळी चोरल्याच्या संशयातून तरुणांना मारहाण करण्यात येत असल्याची माहिती पीडित तरुणाच्या आईला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी पीडित तरुणाला सोडण्याची विनवणी केली. मात्र मारहाण करणाऱ्या नराधमांनी पीडित तरुणाच्या आईलाही धक्काबुक्की केली. त्यामुळे घटना आणखीच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • कामगार रुग्णालयात केलं दाखल : शेळी चोरीच्या आरोपातून तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या मारहाणीत पीडित तरुण गंभीर जखमी झाला आहेत. त्यांना श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेतील नराधमांना तात्काळ अटक करण्याची मागणी रिपईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केली आहे.

घटनेच्या निषेधार्थ आज रास्तारोको आंदोलन : मागासवर्गीय तरुणांना समाजकंटकांनी अमानुष मारहाण केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या घटनेतील मारहाण करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी रिपाईनं करत आज रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी रुग्णालयात जाऊन पीडितांची भेट घेतली. या घटनेतील समाजकंटकांवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात भादंवी कलम 307, 364, 342, 506, 504, 143, 148,149 सह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्यान्वये ( अॅट्रॉसिटी ) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली भेट : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात मागासवर्गीय तरुणांना मारहाण केल्याची घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आमदार लहू कानडे, यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन पीडित तरुणांची चौकशी केली. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Advocates Beaten Youth पोलिसांच्या उपस्थितीत दोन वकिलांनी केली तरुणांना मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
  2. मुरबाड बस स्थानकात जमावासमोर तरुणांना अमानुष मारहाण

Last Updated : Aug 27, 2023, 2:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.