शिर्डी ( अहमदनगर ) : अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात आग लागून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी ( Ahmednagar Civil Hospital Fire ) तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखर्णा ( Civil Surgeon Dr Sunil Pokharna ) यांना निलंबित करण्यात आले होते. याबाबत पोखर्णा यांची चौकशी सुरु असून त्यांना कामावरून काढण्यात आलेले नाही. चौकशी अहवाल आला असून, त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी सांगितले. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले असता ते बोलत होते.
नगरहून निलंबन, शिरूरला नियुक्ती
अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्निकांड प्रकरणात डॉ. सुनिल पोखरणा यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, त्यांचं निलंबन आता मागे घेऊन त्यांची नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शिरुर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ही पदस्थापना राज्यपालांच्या आदेशान करण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिल होत. मात्र, राज्यपाल कार्यालयाकडून राज्यपालांनी विशेष अधिकार वापरुन निंलबन केल नसल्याच राज्यपाल भावनाकडून सांगण्यात आलं आहे.
टोपे म्हणाले की, पोखर्णा यांचं निलंबन करण्यात आलं होत. त्यांना कामावरुन काढण्यात आले नव्हतं. पोखर्णा यांनी त्यांच्या निलंबनाची कार्यवाही झाल्या नंतर राज्यपालांकडे अपिल केले होते. त्यानंतर माझ्या विभागाने राज्यपालांकडे नियमानुसार फाईल पाठवली होती. नियमानुसार त्यांना ते पूर्वी कार्यरत असलेल्या नाशिक विभागात नेमणूक न करता पुणे विभागात नेमणूक केली गेली आहे. त्यामुळे नगर जिल्हा रुग्णालय अग्नीकांड चौकशीत त्यांचा हस्तक्षेप होणार नाही, असं टोपेंनी म्हटल.