शिर्डी (अहमदनगर) - साईमंदिरात काल्याच्या किर्तनानंतर दहीहंडी फोडून रामनवमी उत्सवाची सांगता करण्यात आली आहे. तीन दिवस शिर्डीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात येतो. आज (दि. 22 एप्रिल) शेवटचा तिसरा दिवस असल्याने सकाळी साईमुर्ती आणि समाधीला मंगलस्नान घालण्यात आले. त्यानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सपत्नीक गुरूस्थान मंदिरात महारुद्राभिषेक करण्यात आला आहे.
आज उत्सवाच्या सांगता दिवस पहाटे 4.30 वाजता साईबाबांची काकड आरती झाली. त्यानंतर पहाटे 5.20 वाजता साईबाबांना मंगल स्नान घालन्यात आले. व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी 6.30 वाजता संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सपत्नीक गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा केली. मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी सपत्नीक समाधी मंदिरात पाद्यपुजा केली. सकाळी 10 वाजता मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे गोपाळकाला कीर्तनानंतर संस्थानचे मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर दुपारी 12.10 वाजता साईबाबांची माध्यान्ह आरती झाली.
हेही वाचा - अहमदनगर : शहरात वाईनची दुकाने उघडताच मद्यपींची गर्दी; पोलिसांनी केली कारवाई