ETV Bharat / state

Shilpa Shetty at Saibaba Temple Shirdi : शिल्पा शेट्टीने सहपरिवार घेतले साईबाबा समाधीचे दर्शन; म्हणाली... - शिल्पा शेट्टी साईबाबा समाधी दर्शन

साईबाबा माझे गुरू असून वाईट आणि चांगल्या वेळी साईबाबा सदैव माझ्यासोबत असतात, अशी स्पष्टोक्ती बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने साई दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले. बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा कन्या समीशा शेट्टी, शमिता शेट्टी आणी आई सुनंदा शेट्टी यांनी रविवारी दुपारी शिर्डीत साई दरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले.

Shilpa Sheety Visited Saibaba Samadhi Shirdi
शिल्पा शेट्टी साईबाबा दर्शन
author img

By

Published : Jan 29, 2023, 10:45 PM IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टी

शिर्डी (अहमदनगर) : अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या परिवाराचा साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मालती यार्लगड्डा, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. साई दर्शनानंतर शिल्पा शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, माझ्या परिवारासाठी आणि पुढील कामासाठी साईबाबांचे दर्शन घेऊन प्रार्थना केल्याच शिल्पाने म्हटले. बाबा वाईट आणि चांगल्या काळात कायमच माझ्या बरोबर होते. चांगला मार्ग दाखवण्याचे काम बाबा सतत करत असतात. म्हणून माझा साईबाबांवर विश्वास आहे. दर गुरुवारी साईबाबांच्या नावाने उपवासाचे व्रत करणारी शिल्पा शेट्टी आता शुध्द शाकाहारी झाली असल्याचा प्रश्नांवर उत्तर देताना तिने दुजोरा दिला. नविन वर्षात एक हिंदी चित्रपट आणी दोन वेबसीरीज येत आहेत. 'ममाज अर्थ आयपिओ' येत असून 'ओम साई राम' म्हणून तिने साईबाबांच्या भरोवशावर सोडून दिले असल्याचे सांगितले.

रविना टंडननेही घेतले होते दर्शन : शिर्डी साईबाबा माझाकडून काही घेवुन गेले आणि त्यांनी काही दिले पण, अशा भावना अभिनेत्री रविना टंडनने 17 जानेवारी, 2023 रोजी शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केल्या. त्या पुढे म्हणाले की, मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात माझा वडिलांचे निधन झाले आणि आज शिर्डी साईबाबांना विचारण्यासाठी आले होते की, माझे वडील तुमच्या सोबत आहे ना. आज शिर्डी साईबाबांनाच्या माध्यान आरतीला उपस्थित राहता आल्याने मनाला खूप समाधान मिळाले असल्याचे यावेळी अभिनेत्री रविना टंडन यांनी सांगितले.

मुलीसाठी साईचरणी प्रार्थना : शिर्डी साईबाबांना मी कधीच काही मागत नाही तर साईबाबा न मागताच मला सगळे देत असतात. यामुळे मी साईबाबांचे आभार मानण्यासाठी आज शिर्डीला आली असल्याचे अभिनेत्री रविना टंडन म्हणाल्या. मी लहानपणापासून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत आहे. माझी मुलगी 12 वीत शिकत आहे. तिचे पेपर सुरू होणार असल्याने ती शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येऊ शकली नाही. मी तिच्यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली असल्याचेही रविना यांनी साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.

साईसंस्थानकडून शाल देऊन सन्मान: प्रसिद्ध सिनेअभिनेत्री तसेच शिर्डी साईबाबांची निस्सीम भक्त रविना टंडन आज दुपारी शिर्डीत येवून साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. साईबाबांच्या आरतीनंतर रविनाने साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. यावेळी साईबाबा संस्थानच्यावतीने रविनाचा शॉल देवून सन्मान करण्यात आला. साईबाबांच्या दर्शनानंतर रविना मंदिर परिसरात आली त्यावेळी तिला काही कुत्रे दिसले त्यानंतर त्यांनी आपल्या हाताने कुत्र्यांना बिस्किटही खाऊ घातले.

सोशल मीडियावर सक्रिय : सोशल मीडियावर फनी व्हिडिओ टाकायला मला आवडतात. मीही कधी कधी असे व्हिडीओ टाकत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी शेजारची बाई पळून गेली आहे, तुम्ही कुठे आहे म्हणून असे व्हिडीओ मी सोशल मीडियावर टाकला होता, त्या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली होती. मात्र आम्ही कलाकार आहोत याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

हेही वाचा : Chitra Wagh On Chandrakant Patil : चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटलांची तुलना केली थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.