ETV Bharat / state

कोरोना : परिक्रमेची माहिती घेऊन आयोजकांवर कारवाई करणार - प्रांताधिकारी गोविंद शिंदे - शिर्डी ग्रीन अँण्ड क्लिन

शनिवारी शिर्डीच्या प्रांताधिकाऱ्यांनी परिक्रमा आयोजीत करणाऱ्या ग्रीन आणि क्लीन शिर्डीच्या सदस्यांना यात्रा स्थगित करण्याचे आदेश बजावले होते. रात्री उशिरा या आयोजकांनी परिक्रमा स्थगित करत असल्याचे पत्र प्रशासनाला दिले होते. मात्र, तरीही आज सकाळी परिक्रमा काढली गेल्याने आता कायद्याचा भंग झाल्याचे शिर्डीचे पोलीस पुढील कार्यवाही करणार आहेत.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Mar 15, 2020, 3:19 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - परिक्रमा आयोजित केलेल्या 'शिर्डी ग्रीन अँण्ड क्लिन'च्या सदस्यांना प्रशासनाने परिक्रमा यात्रा स्थगित करावी, असे आदेश दिले असतानाही आज परिक्रमा काढण्यात आली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आदेश देवूनही त्यांच्याच पक्षाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आजच्या यात्रेत सहभाग घेतला होता. आता या परिक्रमेची माहिती घेऊन आयोजकांवर योग्य कारवाई करणार असल्याचे शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.

परिक्रमेची माहिती घेऊन आयोजकांवर कारवाई करणार - प्रांताधिकारी गोविंद शिंदे

गेल्या काही दिवसांपासून या परिक्रमेची तयारी सुरू होती. कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढू लागल्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यात महामारी प्रतिबंध कायदा लागू करत गर्दी होईल असे कार्यक्रम आयोजीत करण्यास बंदी घातली होती. शनिवारी शिर्डीच्या प्रांताधिकाऱ्यांनी परिक्रमा आयोजीत करणाऱ्या ग्रीन आणि क्लीन शिर्डीच्या सदस्यांना यात्रा स्थगित करण्याचे आदेश बजावले होते. रात्री उशिरा या आयोजकांनी परिक्रमा स्थगित करत असल्याचे पत्र प्रशासनाला दिले होते. मात्र, तरीही आज सकाळी परिक्रमा काढली गेल्याने आता कायद्याचा भंग झाल्याचे शिर्डीचे पोलीस पुढील कार्यवाही करणार आहेत.

हेही वाचा - कोरोना : मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे त्यांच्याच खासदाराकडून शिर्डीत उल्लंघन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.