अहमदनगर - शेवगाव पैठण राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. रवींद्र जालिंदर वाघमारे (वय 35, रा. घोडेगाव, ता. नेवासा) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी तळणी गावाजवळ हा अपघात झाला.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगाराची बस (एम. एच. 20 बी. एल. 3465) आणि दुचाकी (एम. एच. 17 बी. के. 7630) यांचा अपघात झाला. रवींद्र साहेबराव पाटील असे बस चालकाचे नाव आहे. तळणी गावाजवळ मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. पुढील तपास शेवगाव पोलीस स्थानकाचे शेळके बी. बी. करत आहेत. तर शेगाव-पैठण महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता किती जणांचे प्राण घेईल, हा प्रश्न नागरिकांसमोर आहे.