ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांवर तरुणीने फेकला शाईचा फुगा - Maharashtra CM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका तरुणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाईचा फुगा फेकला.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांवर शाईफेक
author img

By

Published : Sep 13, 2019, 11:26 PM IST

Updated : Sep 13, 2019, 11:44 PM IST

अहमदनगर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका तरुणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाईचा फुगा फेकला. त्यानंतर त्या तरुणीने सिएम गो बॅकच्या घोषणा दिल्या. अकोले येथे शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज अकोले येथून सुरुवात झाली. शिर्डी विमानतळावरून अकोले येथे बायरोड मुख्यमंत्री यांच्या गाड्यांचा ताफा येत होता. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिशेने शाईचा फुगा फेकला. मात्र हा फुगा मध्येच रस्त्यावर पडून फुटला. त्यामुळे रस्त्यावर शाई पसरली.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांवर शाईफेक

हेही वाचा - प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या मोबाईल फोन्सचा हातोड्याने फोडून केला चुराडा; हे होते कारण

का फेकला फुगा?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधूकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांना अकोले येथून भाजपकडून उमेदवारी देऊ नये. तसेच सरकारचं महापोर्टल बंद कराव आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात या मागण्या करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाईचा फुगा फेकला.

हेही वाचा - शिवसेनेची यादी आपणच तयार करा, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

यापूर्वीही शर्मिला यांनी जालना येथे फडणवीस यांच्या सभेत गोंधळ घातला होता. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पिचड पिता-पुत्रा विरोधात रोषाचे वातावण असून आगामी निवडणुकीत हा रोष मतपेटीतून व्यक्त होण्याची चिन्हे आहेत.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधूकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांना अकोले येथून भाजपकडून उमेदवारी देऊ नये, सरकारचं महापोर्टल बंद कराव आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, आदी मागण्या करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका तरुणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाईचा फुगा फेकला...अकोले येथे शुक्रवारी (१३ सप्टेंबर) सकाळी आकारच्या सुमारास ही घटना घडली....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजानादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज अकोले येथून सुरुवात झाली..शिर्डी विमानतळावरून अकोले येथे बायरोड मुख्यमंत्री यांच्या गाड्यांचा ताफा कोल्हार-घोटी राज्यमार्गावर अकोले सुगाव शिवारात रोकडोबा मंदिराजवळ जवळ येताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिशेने शाईचा फुगा फेकला. मात्र हा फुगा ताफ्यापर्यंत पोहोचू शकला नाही..मध्येच रस्त्यावर फुगा पडून फुटल्याने रस्त्यावर शाई पसरली होती. यापूर्वीही या महिलेने जालना येथे फडणवीस यांच्या सभेत गोंधळ घातला होता. या महिलेनेच पुन्हा अकोले येथे मुख्यमंत्र्यांवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला..परंतु हा प्रकार पोलिसांनी हाणून पाडला. या तरुणीवर पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या पिचड पिता-पुत्रा विरोधात रोषाचे वातावण असून आगामी निवडणुकीत हा रोष मतपेटीतून व्यक्त होण्याची चिन्हे आहेत....Body:mh_ahm_shirdi_cm Ink car_13_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_cm Ink car_13_visuals_mh10010
Last Updated : Sep 13, 2019, 11:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.