अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीस शाळा सुटल्यावर एका अज्ञात आरोपीने आपल्या दुचाकीवरून शहाजापूर शिवारात नेले. तिथे एका निर्जन खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने कोपरगाव तालुका हादरून गेला आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी काल (शुक्रवार) रात्री अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर आता या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवले आहे.
हेही वाचा... महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर, सरकारने श्वेतपत्रिका काढावी - सुप्रिया सुळे
वैद्यकीय तपासणीत मुलीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी या घटनेबाबत मुलीचे अपहरण झाल्याचे सांगितले. तसेच काही तपासण्या झाल्या असून काही बाकी असल्याचे सांगितले. अहमदनगर येथून अहवाल आल्यावर पुढील कारवाई होईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आरोपीच्या शोधार्थ तीन पथके रवाना केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा... मंत्रिमंडळात खांदेपालट.. जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या खात्यांची अदलाबदली
कोपरगाव तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी कोळपेवाडी येथील सहकारी साखर कारखान्यानजीक असलेल्या रयत शिक्षणसंस्थेच्या एका विद्यालयात शिक्षण घेत होती. ती सायंकाळी शाळा सुटल्यावर घराकडे परतलीच नाही. त्यामुळे तिच्या घरची मंडळी अस्वस्थ झाली होती. त्यांनी आजूबाजूला असलेल्या मैत्रिणींकडे व नंतर नातेवाईकांकडे शोध घेतला. यानंतरही ती सापडली नाही. त्यामुळे पोलिसांत याबाबत तक्रार करण्यात आली होती.
हेही वाचा... नागरिकत्व सुधारणा कायदा : नागपुरात १० हजार निर्वासितांना होणार लाभ, नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या अज्ञात आरोपीने शहाजापूर ग्रामपंचायतीच्याजवळ असलेल्या एका निर्जन वस्तीतील खोलीवर या मुलीला नेले. तिथे तिच्यासोबत रात्रभर दुष्कृत्य केले. मात्र, या मुलीचा आक्रांत कोणाला कसा ऐकू आला नाही? कि आरोपीने काही रासायनिक वायूंचा वापर करून तिला बेशुद्ध केले होते? या बाबत अद्यापही पोलीस अनभिज्ञ आहेत. आरोपीने घटनास्थळावर मुलीला सोडून दिल्यानंतर तो फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.