ETV Bharat / state

शेवगावात वीज पडून नववीतील मुलीचा मृत्यू - lightning

रविवारी शेतात काम करायला गेलेल्या शुभांगीच्या अंगावर अचानक वीज पडली आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

वीज
author img

By

Published : Jul 22, 2019, 10:18 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील खामगाव शिवार येथे रविवारी शेतात काम करणाऱ्या एका मुलीच्या अंगावर वीज पडल्याने तिचा मृत्यू झाला. शुभांगी राजू शिंदे (वय १४) असे या मुलीचे नाव असून ती नववीत शिकत होती.

शेवगाव तालुक्यामध्ये रविवारी पडत असलेल्या पावसामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना खामगाव शिवारामध्ये एक दुर्घटना घडली. शुभांगी सकाळी आपल्या शेतामध्ये खुरपणीसाठी गेली असता अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडली. पाऊस पडत असल्यामुळे शुभांगी आणि तिच्या बरोबरीच्या मुली घरी जायला निघाल्या. शुभांगी बरोबर असणाऱ्या इतर दोघी पुढे गेल्यावर शुभांगी एकटीच पाठीमागे राहिली होती. यातच पावसामध्ये अचानक तिच्या अंगावर वीज पडली आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी पावणे दोन ते तीनच्या दरम्यान घडली असे कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले.

Intro:अहमदनगर- शेवगावात वीज पडून नववीतील मुलीचा दुर्दैवी मृत्यू..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_power_death_vij_7204297

अहमदनगर- शेवगावात वीज पडून नववीतील मुलीचा दुर्दैवी मृत्यू..

अहमदनगर- जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये कालपासून पडत असलेल्या पावसामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना खामगाव शिवारामध्ये एक दुर्घटना घडली. शुभांगी राजू शिंदे (वय १४) रा.खामगाव हि नववी मध्ये शिकणारी मुलगी सकाळी आपल्या शेतामध्ये खुरपायला गेली असता अंगावर वीज पडून मृत्यूमुखी पडली, पाऊस आला असता घरी जाण्याच्या तयारीत असताना शुभांगी बरोबर असणाऱ्या इतर दोघीजणी पुढे गेल्यावर शुभांगी एकटीच पाठीमागे राहील होती, पावसामध्ये अचानक वीज तिच्या अंगावर पडून त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी पावणे दोन ते तीनच्या दरम्यान घडली असे कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- शेवगावात वीज पडून नववीतील मुलीचा दुर्दैवी मृत्यू..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.