ETV Bharat / state

सिन्नर-शिर्डी महामार्गावर गॅसचा टँकर उलटला, 1 किलोमीटरचा परिसर सील - सिन्नर - शिर्डी मार्गावर गॅस टँकर उलटला

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरे परिसरात गॅसचा टँकर उलटल्याची धक्कादायक घटना घडली. टँकरमधून गॅसगळती होत असल्यामुळे आजूबाजूचा एक किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.

A gas tanker overturned on the Sinnar-Shirdi highway Ahmednagar
सिन्नर - शिर्डी महामार्गावर गॅसचा टँकर उलटला, 1 किलोमीटरचा परिसर सील
author img

By

Published : Jul 16, 2020, 7:29 PM IST

अहमदनगर - सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरे परिसरात गॅसचा टँकर उलटल्याची धक्कादायक घटना घडली. टँकरमधून गॅसगळती होत असल्यामुळे आजूबाजूचा एक किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. पाथरे परिसरातील 1 किलोमीटर अंतरावरील नागरिकांना दूर हलवले आहे.

घटनास्थळी सिन्नर एच. पी. प्लांट येथील रेस्क्यू टीम दाखल झाली असून, वायूगळती रोखण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अपघातस्थळी समोरच पेट्रोल पंप असल्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एक ते दीड किलो मिटरचा परिसर सील केला आहे.

या दुर्घटनेत चालक जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सिन्नर, कोपरगाव, शिर्डी, संजीवनी साखर कारखाना येथील 4 अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. गॅस कंपनीचे अधिकारी आणि बचाव पथक, पोलीस उपाधीक्षक निफाड, वावी पोलीस देखील दाखल झाले आहेत. गॅसगळती रोखण्याचे प्रयत्न करण्यात येत असून, परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वास गॅस कंपनी अधिकारी व्यक्त करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.