अहमदनगर - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा भारतासह राज्यातही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अहमदनगरमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तेथील प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. नगरमध्ये 24 विदेशी नागरिकांसह ५ भारतीय तबलिगींना 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. या काळात लोकांनी घरात बसावे असे आवाहन पंतप्रधानांसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे.