अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांनी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातील प्रक्रिया मंगळवारपासून सुरु झाली असून, कांबळे यांनी पहिल्याच दिवशी अर्ज भरला. पहिल्या दिवशी २५ जणांनी ४२ अर्ज घेतले आहेत. कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी अर्ज घेऊन गेलेल्याची नावे (कंसात अर्जांची संख्या आणि उमेदवाराचा पत्ता) -
शरद बापू गुंजाळ यांनी भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी (४), सतिश पंढरीनाथ शिंदे यांनी सदाशिव लोखंडे यांच्यासाठी (३), बाळासाहेब एकनाथ सोनवणे ( रा. मुकींदपूर, गाडेनगर, ता. नेवासा) यांनी भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्यासाठी (४), नानासाहेब भानुदास तुपे यांनी अॅड. संतोष कांबळे यांच्यासाठी (४), किशोर दादू वाघमारे यांनी अरुण साबळे यांच्यासाठी (१), बापू पाराजी रणधिर (२), मच्छिंद्र आनंदा नागरे यांनी सुधाकर प्रभाकर रोहम यांच्यासाठी (१), किशोर दादू वाघमारे (१), बहिरीनाथ तुकाराम वाकळे यांनी अॅड. कॉम्रेड बन्सी भाऊराव सातपुते यांच्यासाठी (४), गोरख सिताराम भारुड (रा. निपाणी वडगांव, ता. श्रीरामपूर) (२), दिलीप गोपीचंद बडधे (बेलापूर खु, ता. श्रीरामपुर ) यांनी सोपान तुकाराम औचित्य यांच्यासाठी (२), सुनिल विनायक कांबळे (कोल्हार खु, ता. राहुरी) (१), शिमोन ठकाजी जगताप (निमगांव को-हाळे, ता. राहाता) (१), किरण शेबाजी शेजवळ (भिमनगर, शिर्डी, ता. राहाता )(१), माधव सखाराम त्रिभुवन (आंबेडकरनगर, ता . कोपरगांव) (१), सुरेश एकनाथ जगधने (श्रीरामपुर) (१), गणपत मच्छिंद्र मोरे (खडका, ता. नेवासा ) (१), दिपक प्रमोद क्षेत्रे, (व्दारकाधिश कॉलनी, भिंगार) यांनी अशोक रामचंद्र गायकवाड यांच्यासाठी (१), डॉ. पांडूरंग बाबासाहेब बुरुटे, (रा. पिंपळे गुरव पुणे )(१), रोहम योसेफ आरसुड (नालेगाव) (१), डॉ. विजयकुमार पोपटराव पोटे, ( बुरुडगावरोड, ता. जि. अहमदनगर ) (१), राहुल भैय्या हरिभक्त (मु.पो. भांबोरा, ता. कर्जत) (१), आशिष युवराज बागुल, (रा. लक्ष्मीनारायणनगर, गोंदवणी रोड, श्रीरामपूर) (१), युवराज धनाजी बागुल (श्रीरामपूर) (१), लक्ष्मण काशीनाथ साबळे, कोर्ट रोड, कोपरगाव यांनी अर्ज घेतले आहेत.