ETV Bharat / state

अहमदनगरमधील 'त्या' दोन घटनांप्रकरणी चार पोलीस निलंबित

शहर पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने बेकायदेशीर गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यातील एका आरोपीला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

kotwali police station, ahemednagar
कोतवाली पोलीस ठाणे, अहमदनगर
author img

By

Published : Jan 17, 2020, 5:53 PM IST

अहमदनगर - कोतवाली पोलीस ठाण्यातील चार पोलिसांनी वाळू वाहतूक करणारा डंपर पकडल्यानंतर चालकाकडून पैसे घेऊन त्याला सोडून दिले होते. तसेच गांजा प्रकरणातील अटक केलेला आरोपीही पसार झाला होता. या दोन्हीं घटनांप्रकरणी चारही कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गुरूवारी रात्री ही कारवाई केली. प्रभाकर भांबरकर, राहुल खरात, राजेश जाधव, किरण बारवकर अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत.

शहर पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने बेकायदेशीर गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यातील एका आरोपीला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलीस नाईक बारवकर यांच्या ताब्यातून हा आरोपी पसार झाला होता. तसेच अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर कोतवालीच्या प्रभाकर भांबरकर, राहुल खरात, राजेश जाधव यांनी पकडला होता. तो डंपर पैसे घेऊन सोडून दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोन्ही प्रकरणाची प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गंभीर दखल घेतली. या दोन्ही प्रकरणात दोषी असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

हेही वाचा - पुतळ्यासाठी पैसे आहेत मात्र लोकांच्या आरोग्याचे काय? उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

Intro:अहमदनगर- अवैध वाळू डंपर आणि आरोपी पलायन प्रकरणी 'कोतवाली'चे चार पोलीस निलंबित..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_four_police_suspened_image_7204297

अहमदनगर- वाळू डंपर आणि आरोपी पलायन प्रकरणी 'कोतवाली'चे चार पोलीस निलंबित..

अमदनगर-  वाळू वाहतूक करणारा डंपर पकडल्यानंतर चालकाकडून पैसे घेऊन सोडून दिल्याचा आरोप असणारे आणि गांजा प्रकरणातील अटक केलेला आरोपी पसार झाल्या प्रकरणी चौघां कोतवाली पोलीस ठाण्याच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गुरूवारी रात्री उशिरा निलंबनाची कारवाई केली. प्रभाकर भांबरकर, राहुल खरात, राजेश जाधव, किरण बारवकर अशी निलंबन करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. शहर पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने बेकायदेशीर गांजा वाहतूक करणारे दोघांना ताब्यात घेतले होते. त्यातील एक आरोपी जिल्हा रूग्णालयात उपाचारासाठी दाखल केला होता. पोलीस नाईक बारवकर यांच्या ताब्यातून हा आरोपी पसार झाला होता. तसेच, अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर कोतवालीच्या प्रभाकर भांबरकर, राहुल खरात, राजेश जाधव यांनी पकडला होता. तो डंपर पैसे घेवून सोडून दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोन्ही प्रकरणाची प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गंभीर दखल घेतली. या दोन्ही प्रकरणात दोषी असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केली. त्यानुसार या कर्मचार्‍यांना आज रात्री उशिरा निलंबनाबाबत आदेश दिले आहेत.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- अवैध वाळू डंपर आणि आरोपी पलायन प्रकरणी 'कोतवाली'चे चार पोलीस निलंबित..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.