ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2019 : अहमदनगरमधील कोपरगाव विधानसभेत चौरंगी लढत

कोपरगाव या विधानसभा मतदारसंघात पारंपरिक विरोधकांमध्ये चौरंगी लढत होत आहे. यात प्रामुख्याने काळे विरुध्द कोल्हे तसेच वहाडणे आणि परजणे हे अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यासंदर्भात ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.

अहमदनगरमधील कोपरगाव विधानसभेत चौरंगी लढत...
author img

By

Published : Oct 12, 2019, 5:11 PM IST

Updated : Oct 12, 2019, 8:37 PM IST

अहमदनगर - कोपरगाव या विधानसभा मतदारसंघात पारंपरिक काळे विरुध्द कोल्हे अशी लढत रंगते. मात्र, यावेळी वहाडणे आणि परजणे हे अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे कोपरगावात यावेळी चौरंगी लढत होणार आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.

विधानसभा निवडणूक 2019 : अहमदनगरमधील कोपरगाव विधानसभेत चौरंगी लढत

हेही वाचा - काँग्रेसचं सध्या चाललयं काय? बाळासाहेब थोरात यांची अनकट मुलाखत

गोदावरी नदीच्या किनारी वसलेल्या आणि पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक निवडणुकींपासुन काळे आणि कोल्हे या 2 घराण्यांमध्ये राजकीय लढाई होत राहिली आहे. याच बरोबरीने भाजपचे ज्येष्ठ नेते सुर्यभान पाटील-वहाडणे आणि नामदेवराव परजणे गटाचेही प्रभुत्व राहीले आहे. विधानसभेवर मात्र आलटुन पालटुन काळे आणि कोल्हे या घराण्यातील व्यक्तींनीच जास्त काळ प्रतिनिधीत्व केले आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता भाजपात असलेल्या कोल्हे कुटुबीयांच्या सून स्नेहलता कोल्हे या दुसऱ्यांदा भाजपच्या उमेदवार म्हणुन निवडणूक लढवत आहेत. तर पूर्वी काँग्रेसनंतर शिवसेना आणि आता राष्ट्रवादीत असलेल्या काळे घराण्यातील युवक आशुतोष काळे हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा - सत्ता आणि बहुमताची भाजपला मुजोरी, राज ठाकरे यांचा हल्लाबोल

गेल्या पाच वर्षात सत्तेत असताना केलेला तालुक्याचा विकास आणि मोदींचे व्हिजन मतदारांसमोर मांडत स्नेहलता कोल्हे प्रचार करत आहेत. ते पुन्हा एकदा कोपरगावचे प्रतिनिधत्व देण्याची साद मतदारांना घालत आहेत. कोपरगावात शंकरराव कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखाना, संजिवनी शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातुन कोल्हे घराणे तालुक्यात काम करत आहे. स्नेहलता कोल्हे यांनी बचत गट महिलांचे मोठे संघटनही तालुक्यात उभे केले आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्री आज विदर्भात तर, पवार मराठवाड्यातील या जिल्ह्यात घेणार सभा

तर दुसरीकडे कोपरगाव सहकारी साखर कारखाना, गौतम शैक्षणिक संस्था आणि कोपरगाव पंचायत समितीत आणि तालुक्यातील जिल्हा परिषदेत 4 सदस्य असे राजकीय वर्चस्व काळे गटाच वर्चस्व आहे. यावेळी दुसऱ्यांदा आशुतोष काळे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. गेल्या 5 वर्षांत तालुक्यात न झालेला विकास आणि कोपरगाव शहराच्या पाणी पुरवठ्या साठीचा वाढीव साठवण तलाव तसेच गोदावरी कालव्याचे हक्काचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे हे मुद्दे घेवून राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा - महाराष्ट्र दौरा : नरेंद्र मोदींच्या 'या' शहरात होणार सभा, स्मृती इराणींची माहिती

या मतदार संघात भाजपशी एकनिष्ठ राहिलेल्या दिवंगत सुर्यभान पाटील-वहाडणे यांचे पुत्र विजय वहाडणे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या वेळीही पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी तिकीट मागितले होते. मात्र, पक्षाने त्यांच्या ऐवजी कोल्हे गटाच्या पराग संधान यांना तिकिट दिले होते. त्यामुळे विजय वहाडणेंनी अपक्ष निवडणूक लढवली आणि ते नगराध्यक्ष झाले. त्यानंतर 3 वर्षे वहाडणे विरुध्द कोल्हे असा संघर्ष सुरुच होता. आता विधानसभा निवडणुकीच्या वेळीही वहाडणे भाजपच्या उमेदवारा विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारात कोपरगाव शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न केंद्रस्थानी आहे.

हेही वाचा - बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी, ५ जणांवर कारवाई

या सोबतच मतदार संघातील 13 गावे ही राधाकृष्ण विखे-पाटलांच्या राहाता तालुक्यात आहेत. तसेच कोपरगावच्या निवडणुकीत विखे यांची आणि त्यांची सासुरवाडी असलेल्या परजणे गटाची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. आता विखे-पाटील भाजपमध्ये गेले आहेत आणि नात्याने भाची असलेल्या स्नेहलता कोल्हे या भाजपच्या उमेदवार आहेत. तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे आणि जिल्हा परिषद सदस्य असलेले राजेश परजणे हेही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनीही भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. तालुक्यातील जनतेच्या आग्रहाखातर परीवर्तन करण्यासाठी आणि कोपरगाव शहरासह तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मी निवडणूक लढवत असल्याचे परजणे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - शिवसेनेचा वचननामा शनिवारी होणार जाहीर

कोपरगाव शहरासह तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, गोदावरी कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यात होत जाणारी घट तसेच अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचा दावा करत निवडणुकीचा प्रचार रंगत आहे. तसेच मतदारसंघात सर्वच पक्षात थोडीफार नाराजी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो आणि कोपरगावचा आमदार म्हणून विधानसभेत कोणाला संधी मिळते हे 24 तारखेलाच स्पष्ट होणार आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ कोपरगाव विधानसभा मतदार संघात या निवडणुकीत पारंपारीक विरोधकांन मध्ये राजकीय सामना रंगतोय या मतदार संघात चौरंगी लढत होतेय.यात प्रामुख्याने काळे विरुध्द कोल्हे तसेच वहाडणे आणि परजणे हे अपक्ष उमेदवार आपल नशीब आजमावतायेत....

VO_गोदावरी नदीच्या किनारी वसलेल्या आणि पौराणिक पाश्वभुमी असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार गेल्या अनेक निवडणुकी पासुन काळे आणि कोल्हे या दोन घराण्या मध्ये राजकीय लढाई होत राहीली आहे याच बरोबरीने भाजपाचे जेष्ठ नेते सुर्यभान पाटील वहाडणे आणि नामदेवराव परजणे गटाचही प्रभुत्व राहीलय विधानसभेवर मात्र आलटुन पालटुन काळे आणि कोल्हे या घराण्यातील व्यक्तीनीच जास्त काळ प्रतिनीधीत्व केलय. यंदाच्या निवडणुकीत कॉग्रेस नंतर राष्ट्रवादी आणि आता भाजपात असलेल्या कोल्हे कुटुबीयांच्या सुनबाई स्नेहलता कोल्हे या दुसर्यांदा भाजपाच्या उमेदवार म्हणुन निवडणुक लढवताय तर पुर्वी कॉग्रेस नंतर शिवसेना आणि आता राष्ट्रवादीत असलेल्या काळे घराण्यातील युवक अशुतोष काळे हे राष्ट्रवादी कडुन निवडणुक लढवताय....

VO_गेल्या पाच दक्षात सत्तेत असतांना केलेला तालुक्याचा विकास आणि मोदींच व्हिजन मतदारा समोर मांडत स्नेहलता कोल्हे प्रचार करत पुन्हा एकदा कोपरगीवच प्रतीनीधत्व देण्याची साद मतदारांना घालताय. कोपरगावात शंकरराव कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखाना, संजवनी शैक्षणीक संस्थाच्या माध्यमातुन कोल्हे घरान तालुक्यात काम करतय.स्नेहलता कोल्हे यांनी बचत महीलांच मोठ संघटनही तालुक्यात उभ केलय.....

BITE_ स्नेहलता कोल्हे आमदार तथा भाजपा उमेदवार

VO_कोपरगाव सहकारी साखर कारखाना,गौतम शैक्षणीक संस्था आणि कोपरगाव पंचायत समीतीत आणि तालुक्यातील जिल्हापरीषदेत चार सदस्य अस राजकीय वर्चस्व काळे गटाच वर्चस्व आहे. या वेळी दुसर्यांदा आशुतोष काळे हे निवडणुक रिंगणात उभे आहेत. गेल्या पाच वर्षात तालुक्यात न झालेला विकास आणि कोपरगाव शहराच्या पाणी पुरवठ्या साठीचा वाढीव साठवण तलाव तसेच गोदावरी कालव्यांच हक्काच पाणी शेतकर्यांना मिळाव हे मुद्दे घेवुन काळे निवडणुक लढवताय....

BITE_ आशुतोष काळे राष्ट्रवादी उमेदवार

VO_कोपरगाव मतदार संघात भाजपाशी एकनिष्ठ राहीलेल्या दिवंगत सुर्यभान पाटील वहाडणे यांचे पुत्र विजय वहाडणे यांनी नगरपालीका निवडणुका वेळीही पक्षाकडुन नगराध्यक्ष पदा साठी तिकीट मागीतल होत मात्र ते त्यांना न देता कोल्हे गटाच्या पराग संधान यांना दिल गेल होत त्या मुळे विजय वहाडणेनी अपक्ष निवडणुक लढवली आणि ते नगराध्यक्ष झाले त्या नंत तीन वर्षे वहाडणे विरुध्द कोल्हे असा संघर्ष सुरुच होता आता विधानसभा निवडणुकीच्या वेळीही वहाडणे भाजपाच्या उमेदवारा विरोधात अपक्ष म्हणुन निवडणुक लढवताय.त्याच्याहू प्रचारात कोपरगाव शहराच्या पाणी पुरवठा प्रश्न केंद्र स्थानी आहे....

BITE_ विजय वहाडणे नगराध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार

VO_कोपरगाव मतदार संघातील तेरा गावे ही राधाकूष्ण विखे पाटलांच्या राहाता तालुक्यात आहेत तसेच कोपरगावच्या निवडणुकीत विखे यांची आणि त्यांची सासुरवाडी असलेल्या परजणे गटाची भुमिका महत्वाची राहीलेली आहे. आता विखे पाटील भाजपात गेले आहेत आणि नात्याने भाची असलेल्या स्नेहलता कोल्हे या भाजपाच्या उमेदवार आहेत चर दुसरीकडे राधाकूष्ण विखे यांचे मेव्हणे जिल्हापरीषद सदस्य असलेले राजेश परजणे हे ही अपक्ष उमेदवार म्हणुन उभे आहेत त्यांनीही भाजपाकडे उमेदवारी मागीतली हेती पन ती त्यांना मिळाली नाही तालुक्यातील जनतेच्या आग्रहाखातर परीवर्तण करण्यासाठी आणि कोपरगाव शहरासह तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मि निवडणूक लढवत असल्याच परजणे सांगतात...कोपरगाव शहरासह तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था,गोदावरी कालव्यातुन मिळणार्या पाण्यात होत जाणारी घट तसेच अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याच दावा करत निवडणुकीचा प्रचार रंगतोय. मतदारसंघात सर्वच पक्षात असलेली थोडीफार नाराजी आणि मतदारांचा कैल कोणाच्या पारड्यात पडतो आणि कोपरगावचा आमदार म्हणुन कोण विधानसभेत जात हे 24 तारखेलाच स्पष्ट होणार आहे....Body:mh_ahm_shirdi_koprgaon vidhansabha pkg_12_pkg story_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_koprgaon vidhansabha pkg_12_pkg story_mh10010
Last Updated : Oct 12, 2019, 8:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.